लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदवणे, सोरतापवाडी परिसरात हातभट्टी दारू बनविणाऱ्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकून ३३ हजार रुपयांची गावठी दारू नष्ट केली आहे. तर गावठी दारू बनवीत असलेल्या ठिकाणी दोन महिलेसह एका व्यक्तीवर लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संगीताबाई अनिल चव्हाण (वय-४५), सरस्वती संतोष राठोड (वय-३९ रा. दोघीही काळेशिवार, शिंदवणे ता. हवेली), शंकर फुलसींग ठाकुर (वय-३६ रा. रा. माऊली लाड यांचे घरी भाड्याने सोरतापवाडी ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, सोरतापवाडी, काळेशिवार शिंदवणे, या ठिकाणी काही नागरिक हे बेकायदेशीर गावठी हातभटटीची दारु तयार करण्याची भटटी चालवित आहे. त्या अनुशंघाने वरिष्ठाच्या आदेशानुसार सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता, तीन मोठ्या पत्राच्या भांड्यामध्ये गुळ, तुरटी, व पाणी यांचे तीन हजार लिटर रसायन साहित्याशी गावठी दारू बनवीत असताना वरील तिघेजण आढळून आले.
दरम्यान, त्या ठिकाणी असलेल्या मालाची पाहणी केली असता ३० हजार रुपये किमतीचे हातभट्टी तयार करण्याचे पक्के रसायन, ३ हजार रुपयांचे पत्र्याचे भांडे असा ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. उर्वरित साहित्य जेसीबीच्या सहायाने जागीच नष्ट केले.
सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांचे मार्गदशनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, किरण धायगुडे, प्रमोद हंबीर, पोलीस हवालदार कुंभार, पोलीस नाईक नागलोत, देविकर, साळुंखे, पुंडे, बाजीराव वीर, पवार, शेख, कुलकर्णी, फणसे यांचे पथकाने केली आहे.