Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माजी कुलगुरूंच्या नावाचा वापर करत आयआयटी मुंबईच्या नावाने सायबर चोरट्यांचा गंडा; एमआयटी विद्यापीठाला 2 कोटी 46 लाखांचा फटका

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 11 September 2025, 21:09

पुणे : रिसर्च फंडिंग अपॉर्च्युनिटी प्रोजेक्टसाठी शासनाने मंजूर केलेल्या रकमेच्या 2 टक्के रक्कम भरावी लागेल, असे सांगून सायबर चोरट्यांनी आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांच्या नावाने आणि माजी कुलगुरूंच्या नावाचा वापर करून एमआयटी विद्यापीठाला तब्बल 2 कोटी 46 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे शैक्षणिक अधिकारी डॉ. प्रसाद दत्तकुमार खांडेकर यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार 25 जुलै ते 26 ऑगस्ट 2025 दरम्यान घडला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एमआयटी विश्वशांती विद्यापीठात शैक्षणिक अधिकारी आहेत. त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू रघुनाथ शेवगांवकर यांच्या नावाने 25 जुलै रोजी एक मेसेज आला. या मेसेजमध्ये डॉ. चेथन कामथ हे आयआयटी मुंबईचे प्राध्यापक असून ते विद्यापीठासोबत संशोधन प्रकल्पावर काम करतील, असे म्हटले होते. कामथ यांचा मोबाईल नंबरसुद्धा पाठविण्यात आला होता.

त्यानंतर चेथन कामथ यांनी स्वतः संपर्क साधून डीएसटी/डीआरडीओचा ड्रोन प्रकल्प शासनाने 28 कोटी रुपयांत मंजूर केल्याचे सांगितले. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी मंजूर खर्चाच्या 2 टक्के म्हणजेच 56 लाख रुपये पुढील 3 तासांत भरावे लागतील, असे सांगण्यात आले. एमआयटीचे डीन रिसर्च डॉ. भरत काळे यांनीही हा प्रकल्प उपयुक्त असल्याचे सांगितल्याने सुरुवातीला विद्यापीठाकडून 56 लाख रुपये भरले गेले.

काही दिवसांनी कामथ यांनी पुन्हा संपर्क साधत आर्टिफिशियल इंटेलिजन्स या 23 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी 46 लाख रुपये भरण्याची मागणी केली. त्यानंतर मशीन लर्निंग या 72 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी 1 कोटी 44 लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. या सर्व मागण्या मान्य करून विद्यापीठाकडून तीन टप्प्यांत एकूण 2 कोटी 46 लाख रुपये भरले गेले.

यानंतर 28 ऑगस्ट रोजी सामंजस्य करार करण्यासाठी कामथ यांना एमआयटी विद्यापीठात बोलावले होते. मात्र 26 ऑगस्टपासून त्यांचा संपर्क होत नव्हता. त्यामुळे संशय आल्यावर डॉ. खांडेकर यांनी आयआयटी मुंबईत संपर्क साधला असता, प्रत्यक्ष डॉ. कामथ यांनी कोणत्याही प्रकल्पाबाबत चर्चा केली नसल्याचे स्पष्ट केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर खांडेकर यांनी कुलसचिव गणेश पोकळे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.

यानंतर 28 ऑगस्ट 2025 रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तब्बल 9 दिवसांनी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे पुढील तपास करीत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune-Mumbai Travel: Pune-Mumbai travel now in just 90 minutes! New highway of Rs 15000 crores connecting Atal Setu to Pune Ring Road approved

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दोन दिवस ठराविक वेळेत बंद ; पर्यायी मार्ग कोणते?

Wednesday, 22 April 2026, 17:40

Pune News : रांजणगाव औद्योगिक वसाहतीत युनियन स्थापनेवरून वाद चिघळला ; घटनास्थळी पोलिसांचा तात्काळ बंदोबस्त

Wednesday, 22 April 2026, 17:29
Pune Crime: Inter-district gang involved in theft on highway exposed; Three innkeepers arrested, joint action by local crime branch and Shikrapur police

Fursungi News : फुरसुंगीत सीलबंद घर फोडून पुन्हा ताबा, दोघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 22 April 2026, 17:24

‘भोगवटादार वर्ग-2’ जमिनींचे आता ‘वर्ग-1’ मध्ये रूपांतर होणार ; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय देवस्थान इनाम जमिनींबाबत येणार नवा कायदा

Wednesday, 22 April 2026, 17:00

Loni Kalbhor : निलेश काळभोर यांच्या जीविताला ‘त्या’ फरार आरोपीमुळे धोका ; शिवसेनेच्या वतीने लोणी काळभोर पोलिसांना निवेदन..

Wednesday, 22 April 2026, 16:48

शेतकऱ्यांना मोठा दिलासा..! वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्ण माफ ; तहसीलदारांबरोबरच दुय्यम निबंधक कार्यालयातही आता मोफत नोंदणी

Wednesday, 22 April 2026, 16:17
Next Post

खडकवासला येथील हत्याकांडातील आरोपीस जामीन मंजूर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.