पुणे: एका सायबर गुन्हेगाराने भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) आमदारांची आई आजारी आहे. अशी बतावणी करून त्यांच्या उपचारासाठी पैसे देण्यास सांगून फसवणूक केली आहे. यामध्ये पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर, आमदार देवयानी फरांदे, नाशिक चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांचा समावेश आहे
याप्रकरणी आमदार माधुरी मिसाळ यांची कन्या पूजा मिसाळ यांच्या फिर्यादीवरून पुणे शहर पोलिसांतर्गत बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश राठोड असे आरोपीचे नाव आहे. त्यांनी सर्व आमदारांशी संपर्क साधून त्यांच्या आईला बाणेर रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी पैसे मागितले.
12 जुलै रोजी आरोपींनी आमदार मिसाळ यांच्याशी संपर्क साधून Google Pay वर 3,400 रुपये पाठवण्यास सांगितले होते. या आमदारांशी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांनी हजारो रुपये उकळले आहेत. पुढील तपास सुरू आहे.