Cyber Crime पुणे : नोकरी ऐवजी स्वत:चा व्यवसाय चालू करावा या विचाराने एका तरुणाने इंटरनेटवर व्यवसायाची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यातून डिलरशीप मिळविण्याचा चांगलाच अंगलट आला आहे. इलेक्ट्रिक स्कुटरची निर्मिती करणाऱ्या एथर एनर्जीची डिलरशीप देण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी (Cyber Crime) त्यांना तब्बल २१ लाख ३० हजार ५०० रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार १ ते २६ एप्रिल २०२३ दरम्यान घडला.
या प्रकरणी मगरपट्टा येथील एका ४३ वर्षाच्या तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
फिर्यादी हे आय टी कंपनीत काम करत होते. नोकरी ऐवजी स्वत:चा व्यवसाय चालू करावा, असा त्यांच्या विचार होता. त्यातून त्यांनी इंटरनेटवर काही तरी व्यवसायाची माहिती घेत होते. त्यांनी फेब्रुवारीमध्ये एथर एनर्जी च्या वेबसाईटवर डिलरशीपसाठी अर्ज भरला. त्यांना एकाने कॉल करुन कंपनीने निवड केली असून तुम्हाला ई मेल केल्याचे सांगितले. त्यांनी ईमेलवरील फॉर्म भरून दिल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी डिलरशीपसाठी पेमेंटचे शेड्युल कसे असणार याची माहिती दिली होती.
त्यात रजिस्ट्रेशन फी, लायसन्स, सिक्युरिटी डिपॉझिट, स्टॉक, ॲग्रीमेंट असे सर्व मिळून ६२ लाख ७५ हजार ५०० रुपयांचे शेड्युल देण्यात आले होते. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी २६ एप्रिलपर्यंत एकूण २१ लाख ३० हजार ५०० रुपये पाठविले होते. त्यानंतर त्यांनी विमाननगर येथील एथर एनर्जीच्या स्कुटर शोरुमला भेट दिली. तेथून त्यांनी कंपनीच्या लिगल सेल्स एक्सझिक्युटीव्हशी संपर्क साधला असता, त्यांना आलेला ईमेल व त्यांनी ज्या बँक खात्यात पैसे पाठविले, ते कंपनीचे अधिकृत ईमेल व बँक खाते नसल्याचे समजले.त्यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक डगळे तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime : रात्रीच्या वेळी मोबाईल हिसकाविणाऱ्या चोरट्यांना येरवडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या..