Cyber Crime | पुणे : शहरात चोरी, घरफोडीसह सायबर चोरट्यांनी धुकाकूळ घातला आहे. शिवाय सायबर चोरटे वेगवेगळ्या माध्यमांतून सामान्यांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन (Cyber Crime) माध्यमातून रूम भाड्याने देताय तर सावधान.
हे सायबर चोरटे तर नव्हेत ना याची खात्री करा. कारण, फोनवरूनच रूम भाड्याने घेत असल्याची बतावणीकरून सायबर चोरट्यांनी भाडे व डिपॉझिट ऑनलाईन देण्याची तयारी दर्शवली अन् एका महिलेला तब्बल १ लाखाला गंडा घातला आहे.
याप्रकरणी रास्ता पेठेतील ३० वर्षीय महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अनोळखी मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑनलाईन डिपॉझिट पाठवित असल्याचे सांगून फसवणूक…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांची खराडी येथे रुम आहे. त्यांना ती भाड्याने द्यायची आहे. त्यांना अनोळखी व्यक्तीने फोन केला. तुमची रुम भाड्याने घेण्यासाठी तयारी असल्याचे सांगितले.
ऑनलाईन डिपॉझिट पाठवित असल्याचे सांगून त्यांच्याकडून बँकेची गोपनीय माहिती काढून घेतली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ९९ हजार ९९० रुपये काढून घेऊन त्यांची फसवणूक केली. पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Pune Crime | व्हिडीओ ;लाइक; करणे पडले 22 लाखांना ; आयटी कंपनीतील संगणक अभियंता तरुणीची केली फसवणूक
Pune Fraud News | पुणे : विजय वर्ल्डच्या मालकावर फसवणूकीचा गुन्हा; १८ लाखांच्या फसवणूकीचा आरोप
Fraud News | दलालाकडून प्रसिद्ध इन्शुरन्स कंपनीची फसवणूक; येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल