मुंबई : मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई करून तब्बल साडेपाच कोटीचे १२ किलो सोने पकडून ६ जणांना अटक केली आहे.
सीमाशुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर सुदानी नागरिकाला सीमाशुल्क विभागाने अटक केली. तस्करांनी कमरेला लावायच्या पट्ट्यामधून सोने तस्करी करण्याचा प्रयत्न केला होता. सहा प्रवाशांनी खास डिझाईन केलेल्या बेल्टमधून सुमारे १२ किलो वजनाचे सोने अंदाजे ५ कोटी ३८ लाखाचे जप्त करण्यात आले. याप्रकरणी सहा प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.