राहुलकुमार अवचट
Crime News | यवत , (पुणे) : मुंबई हायवेला सोडतो असे सांगून एका रिक्षाचालकाने प्रवाशाला यवतला सोडून त्याच्या जवळील रोख रक्कम व मोबाईल असा ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुबाडून नेल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. २८) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
संभाजी काशिनाथ पिंगळे ( वय ४५ रा. साई, पो. टाकवी-बुद्रुक, ता. मावळ जि. पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ठाण्यात अज्ञात रिक्षावाल्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे सोलापूर महामार्गावरील यवत ग्रामपंचायत हद्दीतील सह्याद्री हॉटेल जवळील घटना…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी पिंगळे हे स्वारगेट येथून प्रवास करत असताना अनोळखी रिक्षाचालकाने मुंबई हायवे ला सोडतो असे सांगितले. यावेळी रिक्षाचालकाने पिंगळे यांना पुणे सोलापूर महामार्गावरील यवत ग्रामपंचायत हद्दीतील सह्याद्री हॉटेल जवळ सोडले.
त्यावेळी त्याच्याजवळ असलेले रोख रक्कम ४० हजार रुपये व एक ५ हजारांचा मोबाईल फोन असा ४५ हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन रिक्षातून खाली ढकलून फरार झाला.
दरम्यान, यावरून अज्ञात रिक्षा चालकाविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मदने हे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Yavat News : यवत येथे रामनवमी उत्साहात साजरी
Yavat Crime | अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू ; यवत येथे घडला अपघात