Crime News | पुणे : पुणे शहरातील भाजपच्या माजी नगरसेवकाकडे तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईतास गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत ही खंडणी मागितली होती.
अमित जगन्नाथ कांबळे (रा. नवी पेठ) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. या प्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात माजी नगरसेवकाने फिर्याद दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मी मुंबई पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त आहे, असे बतावणी करत कांबळे याने केली. यावेळी त्याने काही दिवसांपूर्वी पुणे कॅन्टोन्मेंटच्या माजी नगरसेवकाच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. तुमच्या विरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करतो. या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून तपास करण्यात येत होता.
आरोपी कांबळे शहरातील ससून रुग्णालयाच्या परिसरात थांबल्याची माहिती पोलिस कर्मचारी मोहसीन शेख आणि पुष्पेंद्र चव्हाण यांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. अटक आरोपीने यापूर्वी राजकीय नेते, डॉक्टर पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून वीसहून अधिक खंडणीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Good News | राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून २४ शेतकऱ्यांना नवीन विहीर
Arrested | किराणा दुकानातील साहित्य चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला रांजणगाव MIDC पोलीसांनी ठोकल्या बेड्या