( Crime News ) रायगड : बैलगाडा शर्यती पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या गर्दीमध्येमध्ये भरधाव बैलगाडी घुसल्याची धक्कादायक घटना अलिबागमधील समुद्र किनारी धुळवडीच्या दिवशी मंगळवारी (ता.७) घडली आहे. या दुर्घटनेत दोन वयोवृ्द्धांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या बैलगाडा शर्यतीला गालबोट लागले आहेत.
राजाराम धर्मा गुरव (वय ७५ रा. झिराड) आणि विनायक नारायण जोशी (वय ७०, रा. ब्राम्हण आळी, अलिबाग) अशी मृत्यू झालेल्या दोन जणांची नावे आहेत.
अलिबाग येथील घटना…
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबागची बैलगाडा शर्यत ही प्राचीन परंपरा आहे. यावर्षीही धुळवडी निमित्त शर्यत आयोजित करण्यात आली होती. अलिबागचे शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी पुरस्कृत, बैलगाडी, घोडागाडी व घोडेस्वारांची शर्यत अलिबागच्या समुद्रकिनारी पार पडल्या.
या शर्यतींचे आयोजन अलिबाग कोळीवाडा शर्यत प्रेमींच्यावतीने करण्यात आले होते. समुद्र किनारी शर्यती पाहण्याकरीता शर्यतप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, बैलगाडा शर्यत सुरु होताच, भरधाव बैलगाडीचे बैल अचानक उसळले. ही बैलगाडी अनियंत्रित होऊन नागरिकांमध्ये घुसली. हा अपघात इतका भयंकर होता की शर्यतप्रेमींची एकच तारांबळ उडाली. आणि यामध्ये राजाराम गुरव व विनायक जोशी हे गंभीर जखमी झाली.
दोघांनाही पुढील उपचारासाठी मुंबईला नेण्यात येत असतानाच विनायक जोशी यांची प्राणज्योत मालवली, तर राजाराम गुरव यांचा मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
येरवड्यात ट्रॅव्हलरची दुचाकीस्वाराला धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
लोणावळ्यात अज्ञात वाहनाने दुचाकीवरील दोघांना दिली जोरदार धडक ; दोघांचा जागीच मृत्यू
हृदयद्रावक! ७ वर्षांपूर्वी आईने ज्या जागी प्राण सोडले, तिथंच मुलाचा अपघातात मृत्यू