(Crime News) मुंबई : २१ वर्षीय मुलीचे भूत मागे लागल्याचे सांगून शुद्धीकरणाच्या नावाखाली व्यवसायाने वकील असलेल्या महिलेवर मांत्रिकाने पतीसमोरच बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता चांदीच्या वाटीत मासिक पाळीतील रक्त घेऊन तांत्रिक पूजेसाठी वापरल्याची धक्कादायक घटना बोरिवलीतील भूषण प्लाझामधील फ्लॅटमध्ये घडली आहे. याप्रकरणी मांत्रिकासह पतीविरोधात बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतीसह तांत्रिक बाबावर बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!
याप्रकरणी व्यवसायाने वकील असलेल्या पालघरमधील एका ४५ वर्षीय महिलेने बोरिवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादीच्या ५१ वर्षीय पतीसह तांत्रिक बाबा संदीप जोशी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला या पालघर परिसरात राहण्यास आहेत. पिडीत महिला यांच्या पतीने सन २००१ ते मे २०२२ या दरम्यान वेळोवेळी त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या मागे २१ वर्षीय मुलीचे भूत लागल्याचे सांगत शुद्धीकरण करण्याच्या नावाखाली तांत्रिक बाबा संदीप जोशी यांच्या बोरिवलीतील भूषण प्लाझामधील फ्लॅटमध्ये नेले. तेथे सुरुवातीला बाबाने जातिवाचक शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिली.
त्यानंतर बाबाने पिडीत महिलेला प्रसादामधून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले आणि पतीसमोर बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता पतीने बाबाच्या सांगण्यावरून मासिक पाळीचे रक्त चांदीच्या वाटीत घेऊन तांत्रिक पूजेसाठी वापरले. तसेच पुढे त्रासातून कायमची सुटका करण्यासाठी ४९ हजार रुपयांची मागणी केली. पैसे नाही दिले तर मृत्यू होईल, अशी भीती घालून ४९ हजार रुपये उकळल्याचा आरोप महिलेने केला.
याप्रकरणी पिडीत महिलेने बोरिवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादीचा पती व तांत्रिक बाबा संदीप जोशी यांच्यावर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार सहबलात्कार व खंडणी, जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Crime : वानवडीत दारूच्या नशेत तोडफोड करणार्या चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या!