पुणे : हरवलेला व्यक्ती अमिर मोहम्मद शेख (वय २५ वर्षे.रा. आदर्शनगर, मोशी, पुणे) हा दि. १५ जून रोजी राहत्या घरातुन कंपनीत कामाला जातो असे सांगुन निघुन गेला. तो परत घरी न आल्याने त्याबाबत त्याची पत्नी अरीना अमीर शेख. हीने एमआयडीसी भोसरी पोलिस स्टेशन येथे तीचे पती मिसिंग झाले बाबत तक्रार दाखल केली होती.
सदर मिसिंगचा तपास करत असताना सदर तपासामध्ये यातील मिसिंग व्यक्ती नामे अमिर मोहम्मद शेख यास त्याचा साडू-पंकज विश्वनाथ पाईकराव(रा. मार्तंडनगर, चाकण) याने फोन करुन बोलावुन घेतले होते. त्यावरुन अमिर मोहम्मद शेख याचे वडील नामे मोहम्मद कासिम शेख (वय ५० वर्षे) यांनी लह्यांचा मुलगा अमीर शेख यास त्याचा साडु-पंकज विश्वनाथ पाईकराव व सुन निकीता/अरीना हीच्या माहेर कडील लोकांनी (रा. रांधे, ता-पारनेर, जि-अहमदनगर) यांनी त्यांची मुलगी निकीता/अरीना सोबत त्यांच्या मनाविरुध्द लग्न केल्याचा राग मनात धरुन मुलगा आमीर शेख यास आदर्शनगर, मोशी पुणे येथुन जबरदस्तीने जिवीताचे बरे वाईट करण्यासाठी अपहरण करुन कोठेतरी घेवुन गेले आहेत.
त्याबाबत मोहम्मद कासिम शेख. याने पंकज विश्वनाथ पाईकराव, वय २८ वर्षे रा.मार्तडनगर, चाकण, पुणे मुळगाव भिंगे आडगाव, ता हिंगोली, जि-हिंगोली व सुनेच्या माहेरच्या लोकांच्या विरुध्द तक्रार दिल्याने त्याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे पिं.चिं. गुन्हा. रजि. नं. ३२५/२०२४ भा. दं. सं. कलम ३६४.३४ प्रमाणे दि.२७/०६/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गुन्ह्यामध्ये पंकज विश्वनाथ पाईकराव, सुशांत गोपाळा गायकवाड, गणेश गायकवाड हे आरोपी असल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाल्याने आरोपी पंकज विश्वनाथ पाईकराव, सुशांत गोपाळा गायकवाड यास लोणावळा येथुन ताब्यात घेवुन त्यांना सदर गुन्ह्यात दिनांक २९ जून रोजी अटक करण्यात आली होती.
सदर आरोपी यांना नमुद गुन्ह्यात अटक करुन त्यांचेकडे चौकशी केली असता. नमुद आरोपी हे डांबर प्लॅन्ट कंपनी, मु-हेवस्ती, कुरुळी, ता. खेड. जि. पुणे.चे शेजारील मंदीरात एकत्र बसुन यातील अपहृत इसम अमीर मोहम्मद शेख याचे अपहरण करून, त्यास जीवे ठार मारणे बाबतचा कट रचला. त्याप्रमाणे आरोपी पंकज पाईकराव याने यातील अपहृत इसम अमीर शेख यास दारु पिण्याच्या बहाण्याने फोन करुन बोलावुन घेवुन त्यास कुरुळी जवळील पुणे नाशिक हायवे वरील एका हॉटेलमध्ये नेऊन दारु पाजली.
अमीर शेख हा नाणेकरवाडी येथे एका कंपनीत कामावर गेला असता त्यास आरोपी पंकज याने पुन्हा दारु पिण्याचे बहाण्याने फोन करुन बोलावुन घेतले. आळंदी फाटा येथील एका हॉटेल मधुन दारु घेवुन ते दोघे चाकण आळंदी रोडचे कडेला मेदनकरवाडी गावचे हद्दीतील जंगलात दारु पित बसले. त्यावेळी त्यांचे पाठीमागुन आलेल्या आरोपी नामे सुशांत गोपाळा गायकवाड व गणेश दिनेश गायकवाड (पाहीजे आरोपी) यांनी पंकज यास फोन करुन बाजुला जाणेस सांगुन त्या दोघांनी अमीर मोहम्मद शेख यास मारहाण करत जंगलात ओढत नेऊन, त्याच्या डोक्यात दगड घालुन त्यास ठार मारले. त्यानंतर त्याचा मृतदेह जंगलात लपवुन ठेवली.
त्यानंतर सदर मृतदेह जाळण्यासाठी वरील आरोपी बी. के. खोसे. डांबर प्लॅन्ट कंपनी पुणे, या कंपनीत येवुन यातील आरोपी सुनिल किसन चक्रनारायण याने सदर बॉडी जाळण्यासाठी लागणारे एल. डी. ओ. डिझेल सदर कंपनीचे टाकीतुन काढुन दिले. त्यानंतर आरोपी नामे सुशांत गोपाळा गायकवाड व गणेश दिनेश गायकवाड यांनी ते एल. डी. ओ. डिझेल मयतावर टाकुन त्यास जाळुन टाकले. त्यानंतर आरोपी सुशांत गोपाळा गायकवाड व गणेश दिनेश गायकवाड यांनी पुरावा नष्ट करण्याचे हेतुने मयताची हाडे व राख दोन वेगवेगळ्या गोण्यात भरुन ते नदीत टाकुन दिले. आरोपी यांनी अपहृत व्यक्तीचा खुन करण्याचा कट रचुन त्यास जीवे ठार मारुन पुरावा नष्ट केला. सदर गुन्ह्यास भा.दं.वि. कलम ३०२,२०१,१२० (ब) प्रमाणे कलमवाढ करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री विनयकुमार चौबे साो. मा. अप्पर पोलीस आयुक्त साो वसंत परदेशी, मा. पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार साो. परि-०३, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सचिन हिरे साो. एमआयडीसी भोसरी विभाग, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणेश जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक राजेंद्र पानसरे, पोलीस अंमलदार चंद्रकांत गवारी, शरद गांधिले, राजू जाधव, संजय जरे, स्वप्निल शेलार, गणेश बो-हाडे, राहूल लोखंडे, ज्ञानेश्वर चव्हाण, प्रविण मुळुक, नितिन खेसे, विशाल काळे, आनंद जाधव, अक्षय क्षीरसागर यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार हे करीत आहेत.