Crime News | पुणे : मामीचे नाते असलेल्या आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या महिलेला तिच्या पतीला, मुलाला जीवे मारण्याची धमकी देत त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांच्याशी शारीरीक संबंध ठेवले. तसेच त्यांचे लग्न झाले असतानाही मंदिरात नेऊन त्यांच्याशी जबरदस्तीने लग्न करुन गळ्यात मंगळसुत्र घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत किरण दत्तात्रय मारणे (वय २५, रा. शिवकल्याणनगर, सुतारदरा, कोथरुड ) याच्यावर कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २८ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे.
हा प्रकार आरोपीच्या घरी, सातारा, कोल्हापूर, जांभुळवाडी येथे फेब्रुवारी ते २३ मे २०२३ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२३ मध्ये आरोपी फिर्यादीच्या घरी आला. त्यांचे पती, मुलगा व इतर नातेवाईकांना जीव ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. त्यानंतर ११ मे रोजी फिर्यादींना आपल्या केळेवाडीतील रुमवर बोलावून तेथे त्यांना पुन्हा धमकी देऊन त्यांना सातारा, कोल्हापूर, येथे घेऊन गेला. तेथे लॉजवर त्यांच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध केले.
त्यानंतर फिर्यादी यांना जाभुंळवाडी येथे घेऊन जाऊन तेथील मंदिरात फिर्यादीच्या गळ्यात जबरदस्तीने मंगळसुत्र घालून लग्न केले. त्यानंतर फिर्यादीनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक आडगळे तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Hingoli Accident : हिंगोलीत भीषण अपघात, पाच जणांसह १९० मेंढ्यांचा जागीच मृत्यू
Accident | भरधाव टेम्पो थेट रेल्वेरुळावरच झाला पलटी ; जेजुरी जवळच्या भोरवाडी फाट्यावरील घटना