Crime News | पुणे : पुणे शहराच्या मध्यभागातून भरदिवसा बँकेत भरणा करण्यासाठी निघालेल्या एका कामगाराला मारहाणकरून लुटलेल्या ४७ रोकड प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. फिल्मी स्टाईल रोकड लुटणारा मास्टर माईंड पोलिसांच्या जाळ्यात आल्यामुळे सर्वानी सुटकेचा श्वास घेतला आहे.
शहरातील नाना पेठेत लुटीचा घडला होता थरार…
शहरातील नाना पेठेत हा लुटीचा थरार घडला होता, चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवत व्यापाऱ्यास लुटले होते.समर्थ पोलिसांनी याप्रकरणातील मास्टर माईंडला बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून २५ लाखांची रोकड जप्त केली आहे. तर, प्रत्यक्षात मारहाणकरून लुटणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट एकने पकडले आहे.
समर्थ पोलिसांनी ऋषीकेश मोहन गायकवाड (वय २८, रा. बिबवेवाडी) याला अटक केली आहे. तर, गुन्हे शाखेने किरण अशोक पवार व आकाश कपील गोरड (रा. बिबवेवाडी) यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. याबाबत मंगलपुरी गोस्वामी (वय ५५) यांनी तक्रार दिली आहे.
गेल्या आठवड्यात (गुरूवारी) नाना पेठेतील आझाद चौकात रोकड लुटीचा थरार सकाळी ११ च्यादरम्यान घडला होता. ऋषीकेश हा पुर्वी संबंधित एजन्सीत नोकरीस होता. त्याला गेल्या वर्षी नोकरीवरून काढण्यात आले होते.
त्यामुळे त्याला सर्व माहिती होती. त्याने दोन साथीदारांच्या मदतीने हा कट रचला होता. ही कारवाई पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Indapur News |डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शिवाजी मखरे
Satara News : संविधान रक्षणासाठी लढणे आवश्यक ; शाहीर संभाजी भगत