( Crime News ) पिंपरी-चिंचवड : विक्रेत्या महिलेला बोलण्यात गुंतवून सोन्याच्या दुकानातून चोरी (chori)केल्याचा प्रकार भोसरीतून समोर आला आहे. तीन महिलांनी नजर चुकवून तब्बल पावणेदोन लाख रूपये किमतीच्या सोन्याच्या वाट्या लांबवल्या आहेत. हा प्रकार भोसरीतील भांबुर्डेकर ज्वेलर्समध्ये 4 मार्च रोजी घडला आहे.
याप्रकरणी शितल सिताराम दळवी-कांगणे (वय 34, रा. धावडे आळी, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून पोलीसंनी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तब्बल पावणेदोन लाख रूपये किमतीच्या सोन्याच्या वाट्या लांबवल्या…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दळवी या भांबुर्डेकर सराफ अॅण्ड ज्वेलर्स (jwellwers)या दुकानात सेल्समन म्हणून नोकरीला आहेत. 4 मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्या दुकानात असताना तीन महिला दागिने खरेदीच्या बहाण्याने दळवी यांच्या काऊंटरवर आल्या.
दागिने पाहत असताना महिलांनी दळवी यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. त्यांची नजर चुकवून 1 लाख 75 हजार रूपये किमतीच्या सोन्याच्या वाट्या चोरून त्या पसार झाल्या. पुढील तपास पोलीस करत आहेत.