Crime News | देहूरोड : रागाने का बघतो असे म्हणून चार जणांनी तरुणावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना देहूरोड परिसरात गुरुवारी (ता. १३) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी ४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छोटू लक्ष्मण जतने, सुरज लक्ष्मण जतने, साहील लक्ष्मण जतने, लक्ष्मण जतने (सर्व रा. देहूरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी उमर कासिम शेख (वय २२, रा. देहूरोड) यांनी शुक्रवारी (ता. १४) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख हे देहूरोड येथे एका मेडिकल दुकानावर उभे होते. त्यावेळी आरोपी छोटू जतने तेथे आला. तू माझ्याकडे रागाने का बघतो, असे तो फिर्यादीला म्हणाला. मी कुठे तुझ्याकडे रागाने बघतो, असे फिर्यादी शेख म्हणाले.
हाताच्या मनगटावर जोरात मारून जबर दुखापत…
दरम्यान, शेख म्हणाल्याचा राग आल्याने आरोपी छोटू जतने याने त्याचा भाऊ सुरज आणि साहील व लक्ष्मण जतने यांना बोलावून घेतले. त्यानंतर छोटू याने त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादी शेख यांच्या हाताच्या मनगटावर जोरात मारून जबर दुखापत केली.
त्यानंतर आरोपी सुरज जतने हॉकीस्टिकने फिर्यादीशेख यांच्या पाठीत मारले. तसेच आरोपी साहील व लक्ष्मण जतने यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. अशी फिर्याद शेख यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात दिली आहे.
त्यानुसार चार जणांच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Daund Crime : गरोदर असलेल्या महिलेचा मृतदेह दौंड तालुक्यातील कासुर्डीतील कॅनॉलमध्ये आढळला..!