( Crime News ) नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी ६० कोटींचे ‘डिस्को बिस्किट’ पकडून तीन जणांना अटक केली आहे. अहुका जुडे, उमरलब्राहिम आणि चिनीजी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हॉलिवूड चित्रपटात वापरलेले ड्रग्ज कमाईचे साधन…
हे ‘डिस्को बिस्किट’ या नावाचे हे खास ड्रग्स ग्रेटर नोएडातील एका महागड्या भागात ठेवण्यात आले होते. तेथून आणून दिल्लीत विकले जात होते. दिल्ली-एनसीआरमध्ये राहणार्या आफ्रिकन वंशाच्या तरुणांनी या हॉलिवूड चित्रपटात वापरलेले ड्रग्ज हे त्यांच्या कमाईचे साधन बनवले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन आरोपींपैकी एक अहुका जुडे याला पोलिसांनी ४ मार्च रोजी अटक केली होती. धौला कुआनजवळील पेट्रोल पंपावर तो ड्रग्जची खेप घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. व त्याने ‘डिस्को बिस्किट’ चे सर्व गुपिते उघड केली.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी अहुका जुडे याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपी हा दिल्ली-एनसीआरमध्ये चालणाऱ्या ड्रग कार्टलचा सदस्य आहे. आफ्रिकन नागरिक ते चालवत आहेत. आरोपी हा ग्रेटर नोएडा येथे राहणाऱ्या अन्य अटक आरोपी उमरलब्राहिमकडून ड्रग्ज खरेदी करत होता.
त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ५ मार्च रोजी जनकपुरीजवळील माता चानन देवी हॉस्पिटलजवळ उमरलब्राहिमला अटक केली. तोही तिसरा आरोपी चिनीजीकडून ड्रग्ज मिळवायचा असे आरोपीने सांगितले. या आधारे पोलिसांनी ६ मार्च रोजी चिनीजीलादेखील अटक केली आहे.
याबाबत बोलताना विशेष पोलीस आयुक्त एचजीएस धालीवाल म्हणाले की, “या प्रकरणी आतापर्यंत ३ तस्करांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ तस्करीचा मालक पश्चिम आफ्रिकन देशाचा आहे. अटक केलेले तिघेजण गेल्या २ वर्षांपासून हा व्यवसाय करत होते. आरोपी कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय भारतात राहत होते. असे तपासात समोर आले आहे.”
डिस्को बिस्किट म्हणजे काय ते जाणून घ्या…
डिस्को बिस्किट हे खरे तर एका ड्रगचे नाव आहे. त्याचं मूळ नाव मेथाक्वालोन आहे. हे ड्रग्स प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट ‘द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’मधून चर्चेत आले. भारतात या ड्रग्जवर बंदी आहे. जर कोणी त्याचे सेवन, खरेदी व विक्री करताना आढळून आल्यास त्याच्यावर नार्कोटिक्स ड्रग अँड सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्यान्वये कारवाई केली जाते. यूएसमध्ये ते १९८३ मध्ये बाजारातून हटवण्यात आले. १९८४ मध्ये शेड्यूल १ ड्रग्स श्रेणीत त्याची नोंद ठेवली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Baramati Crime : बारामतीतील लघु पाटबंधारे विभागाचा इंजिनियर अडीच लाखाच्या लाच प्रकरणी गोत्यात
Crime News : बैलगाडा शर्यतीला गालबोट ! बैलगाडीचे बैल उसळल्याने दोन ज्येष्ठांचा मृत्यू