Crime : पुण्यातील अॅन्टी करप्शन ब्युरोने बंडगार्डन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर यांच्यावर गंभीर कारवाई केली आहे. 40 वर्षीय तक्रारदाराकडे फसवणूक प्रकरणातील गुन्हा दाखल न करण्याच्या बदल्यात त्यांनी 2,00,000 लाच मागितल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. पडताळणी दरम्यान त्यांच्या मागणीची रक्कम 1,00,000 असल्याचे स्पष्ट झाले.

हा प्रकरण 3 फेब्रुवारी 2026 रोजी उघडकीस आला, ज्या वेळी तक्रारदाराने पुणे ACB विभागात तक्रार नोंदवली होती. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक प्रविण निबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पडताळणी करण्यात आली. पंचासमक्ष आणि तक्रारदाराच्या वकीलासमक्ष, उपनिरीक्षक खेडकर यांनी स्वतःसाठी आणि वरिष्ठांसाठी लाचची मागणी केल्याचे आढळून आले.
याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे शहर गु. रजि. नं. 58/2026 कलम 7, 7अ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.







