पुणे : शाळेतून काढून टाकेन, परीक्षेला ही बसू देणार नाही अशी धमकी मुख्यध्यापकांनी दिल्यानंतर दहावीतील विद्यार्थाने आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. याप्रकरणी मुख्याध्यापकांविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयुष गारळे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थाचे नाव आहे. हितेश शर्मा असे गुन्हा दाखल झालेल्या मुख्याध्यापकांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आयुष दिघी येथील प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. आयुष अभ्यास करत नाही, म्हणून शाळेतून काढून टाकेन, तसेच दहावीच्या परीक्षेत हक्काचे 20 गुण देणार नाही, दहावीच्या परीक्षेला ही बसू देणार नाही, अशी धमकी मुख्याध्यापक हितेश शर्माने आयुषला दिली. त्यानंतर शाळेतून घरी आणण्यासाठी आयुषी आई गेल्यानंतर मुख्याध्यापक शर्मा यांनी आईला आवाज देऊन बोलावून घेऊन वरील सर्व बाबी त्यांना सांगितल्या.
दरम्यान, मंगळवारी (ता.१३ ) रोजी घरातील सगळे बाहेर गेले, तेव्हा आयुष घरी असल्याने आयुषने गळफास घेत आयुष्य संपवले. त्याच्या मृत्यूला मुख्याध्यापक जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून भोसरी पोलिसांनी मुख्याध्यापक शर्मा यांच्यावर शनिवारी (ता.२४) रोजी कलम ३०५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.