उरुळी कांचन, (पुणे) : जमिनीच्या मोजणीवरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 303 मध्ये घडली. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रारी देण्यात आल्या असून एकूण आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शनिवारी (ता. 18) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

पहिल्या घटनेत स्वप्नील शिवाजी मोटे (वय 26, धंदा, शेती, रा. सोरतापवाडी, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जमीन गट क्र. 303 ची सरकारी मोजणी सुरू असताना हरकत घेतली. याचा राग आल्याने केरू कामाजी कोळेकर, प्रतिक केरू कोळेकर, वैषाली केरू कोळेकर, (सर्व रा. सोरतापवाडी, ता हवेली) व तानाजी शेळके (पूर्ण नाव माहित नाही. भांडगाव ता. दौंड) यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली.
तर तानाजी शेळके याने लोखंडी गजाने सागर मोटे यांच्या डोक्यात वार करून दुखापत केली. प्रतिक कोळेकर याने दगडाने मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितानुसार विविध कलमान्वये चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत केरू कामाजी कोळेकर, (वय 49, धंदा शेती, रा. सोरतापवाडी, ता. हवेली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कोळेकर यांच्या मालकीच्या जमिनीत मोजणी सुरू असताना सागर तात्याबा मोटे, जयदीप संजय चौधरी, स्वप्नील शिवाजी मोटे, व तात्याबा मारूती मोटे (सर्व रा. सोरतापवाडी, ता तिथे येऊन मोजणीस मज्जाव केला.
यावेळी झालेल्या वादात सागर मोटे याने केरू कोळेकर यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. तसेच मुलालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी वरील चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान, याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या असून त्यानुसार आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.







