Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Funsungi fraud : फुरसुंगीत फर्निचरच्या नावाखाली महिलेला एकाने घातला दीड लाखांचा गंडा

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 April 2026, 17:49

Funsungi fraud फुरसुंगी, ता. २२ : घरातील फर्निचरचे काम करून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १ लाख ५३ हजार रुपये उकळून काम न करता टाळाटाळ करणाऱ्या आरोपीचा भंडाफोड फुरसुंगी परिसरात झाला आहे. ऑनलाईन संपर्कातून विश्वास संपादन करून ‘कंपनीतून काम करतो’ असा बनाव करत या फसवणुकीचा डाव रचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Funsungi fraud

 

याप्रकरणी पूजा कृष्णा बागल (वय ३४, रा. कुमार पार्क इन्फिनिया, फुरसुंगी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहसीन हनीफ शेख (रा. भवानी पेठ, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पूजा बागल यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये घरातील फर्निचरचे काम करण्यासाठी ऑनलाईन शोध घेतला. त्यावेळी मोहसीन हनीफ शेख (रा. भवानी पेठ, पुणे) याच्याशी संपर्क आला. आरोपीने स्वतःला अनुभवी फर्निचर कंत्राटदार असल्याचे सांगत पुण्यातील विविध कामांचे फोटो दाखवून विश्वास संपादन केला. Funsungi fraud

यानंतर आरोपीने फिर्यादी व त्यांच्या पतींना पिसोळी येथील एका फर्निचर युनिटमध्ये नेऊन ओळख करून दिली. “डायरेक्ट कंपनीतून फर्निचर तयार करून देतो, त्यामुळे खर्च कमी होईल आणि १० ते १२ दिवसांत काम पूर्ण होईल,” असे आश्वासन देण्यात आले. त्यानुसार ‘पॉश लिव्हिंग इंटेरियर’ या नावाने १ लाख ८० हजार रुपयांचे कोटेशन पाठवण्यात आले. आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादींनी सुरुवातीला १५ हजार रुपये अॅडव्हान्स दिले. त्यानंतर विविध कारणे सांगत आरोपीने वेळोवेळी पैशांची मागणी केली. गुगल पेच्या माध्यमातून २५ हजार, ५० हजार, १० हजार, ३८ हजार, ५ हजार आणि १० हजार असे एकूण १ लाख ५३ हजार रुपये आरोपीला देण्यात आले. Funsungi fraud

दरम्यान, आरोपीने काम सुरू असल्याचे भासवण्यासाठी काही साहित्य घरात आणून ठेवले. मात्र त्यानंतर कामाची कोणतीही प्रगती झाली नाही. “लवकरच काम पूर्ण करतो” असे सांगत तो वारंवार टाळाटाळ करत राहिला. फर्निचरचे काम पूर्ण होत नसल्याने फिर्यादींना संशय आला. त्यांनी आरोपीकडे काम पूर्ण करण्याची किंवा पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र आरोपीने ना काम केले, ना पैसे परत केले. उलट विविध कारणे देत तो संपर्क टाळू लागला. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर फिर्यादींनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी मोहसीन हनीफ शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Funsungi fraud

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Traffic jam on Pune-Solapur road : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तीन तास ठप्प, पोलीस आयुक्त, आमदार-खासदारांसह लोकप्रतिनिधींचे सपशेल दुर्लक्ष

Wednesday, 22 April 2026, 19:03

Funsungi fraud : फुरसुंगीत फर्निचरच्या नावाखाली महिलेला एकाने घातला दीड लाखांचा गंडा

Wednesday, 22 April 2026, 17:49
Pune-Mumbai Travel: Pune-Mumbai travel now in just 90 minutes! New highway of Rs 15000 crores connecting Atal Setu to Pune Ring Road approved

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दोन दिवस ठराविक वेळेत बंद ; पर्यायी मार्ग कोणते?

Wednesday, 22 April 2026, 17:40

Pune News : रांजणगाव औद्योगिक वसाहतीत युनियन स्थापनेवरून वाद चिघळला ; घटनास्थळी पोलिसांचा तात्काळ बंदोबस्त

Wednesday, 22 April 2026, 17:29
Pune Crime: Inter-district gang involved in theft on highway exposed; Three innkeepers arrested, joint action by local crime branch and Shikrapur police

Fursungi News : फुरसुंगीत सीलबंद घर फोडून पुन्हा ताबा, दोघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 22 April 2026, 17:24

‘भोगवटादार वर्ग-2’ जमिनींचे आता ‘वर्ग-1’ मध्ये रूपांतर होणार ; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय देवस्थान इनाम जमिनींबाबत येणार नवा कायदा

Wednesday, 22 April 2026, 17:00
Next Post

Traffic jam on Pune-Solapur road : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तीन तास ठप्प, पोलीस आयुक्त, आमदार-खासदारांसह लोकप्रतिनिधींचे सपशेल दुर्लक्ष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.