अजित जगताप
फलटण : राजकीयदृष्ट्या जागरूक व काही पत्रकारांची पंढरी समजली जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील फलटण शहरातील फक्त तीन दारू दुकानाविरोधी थेट मुंबईत आझाद मैदानावर फलटणचे कार्यकर्ते आमरण उपोषण करीत आहेत. त्यामुळे आंदोलन फलटणऐवजी मुंबईला का होत आहे ?याची उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
फलटण येथील स्थानिक नागरिक व राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सातारा जिल्हाध्यक्ष पांडुरंग समुद्रलाल अहिवळे यांनी कार्यकर्त्यांसह विद्यमान राज्य सरकार मधील शिंदे सेना व भाजप राज्य सरकारचा दारू दुकानांच्या प्रश्नावरून जाहीर निषेध करीत आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. फलटण शहरातील नियमबाह्य तीन दारू दुकाने आहेत. हे धार्मिक स्थळा नजिक असूनही त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. यामुळे हिंदुसह इतर धर्मीय लोकांना नवल वाटत नाही. शासन नियमांची पायमल्ली करून
सदरची दारू दुकाने सुरू असतात.ज्यादिवशी ही दुकाने शासकीय पातळीवर काढण्यात आलेल्या आदेशानुसार बंद असतात. त्यावेळी सुध्दा या परिसरात देशी-विदेशी दारू ज्यादा दराने विक्री केली जाते. याचे अनेकजण साक्षीदार आहेत पण, त्याबाबत कधी ही वाच्यात केली जात नाही.असा ही गंभीर आरोप करण्यात आला आहे. राजकीयदृष्ट्या फलटण परिसरात मोठे प्रस्थ आहे. त्याच बरोबर विधायक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या समांतरपणे पत्रकारांच्या कल्याणासाठी संघटनांही कार्यरत आहे.
देशभरात नावलौकिक प्राप्त केलेल्या गोष्टी असताना फलटण ऐवजी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण कर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केल्याने त्याची महाराष्ट्र राज्यभर चर्चा होणे स्वाभाविक आहे. याबाबत सत्य परिस्थिती वाचक व लोकांच्या समोर येणे आवश्यक बाब बनली आहे.अन्यथा सॊशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होत असल्याने राजकारण व प्रशासन आणि जागरूक पत्रकारिता यांनीच खुलासा करणे गरजेचे आहे.
दरम्यान, कर नाही तर डर कशाला?असे त्याचे वर्णन केले जात आहे. प्रश्न फलटणचे नि आंदोलन मुंबईला असा प्रकार का घडत आहे. याचे आता सर्वांनीच आत्मचिंतन करून सत्याची कास धरली तर सत्य समोर येईल. असे जाणकार लोकांनी सांगितले आहे.
याबाबत राज्य सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेऊन जाब विचारला पाहिजे. अन्यथा छातीठोकपणे सत्याच्या मागे उभे आहोत. असे सांगून त्या तीन अधिकृत असतील तर त्या दारू दुकानांच्या मागे उभे राहावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दारू दुकानांना अधिकृत परवाना देत असताना नियमांचे पालन केले जाते का? याचे किमान एकदा तरी पुनर्तपासणी करावी.जेणेकरून दारू दुकाने हटविण्यासाठी कार्यकर्त्यांनी मुंडण करण्यास लागू नये अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे.