लोणी काळभोर, (पुणे) – चंदनाची चोरी करणाऱ्या एका तस्कराला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्याकडून चंदन चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना यश आले आहे.
सद्दाम बेसमिल्हादू लोद (वय ३४, रा. जंजाळा, ता. सिल्लोड, जि. ओैरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी भागातून मागील काही दिवसांपासून चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना घडल्या होती. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांना चंदन चोरटा चंदननगर भागातील नदीपात्रात थांबला आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून चोरट्याला मोठ्या शिताफीने अटक केली. लोद याच्याकडून चंदनाच्या झाडाची दोन बुंधे जप्त करण्यात आले. तर त्याचे दोन साथीदार पसार झाले आहेत.
दरम्यान, आरोपी सद्दाम लोद याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने वडगाव शेरीतील डिमेलो सर्व्हिस परिसरातून लोदने चंदनाचे झाड कापून नेल्याचे उघडकीस आले आहे. लोदने वानवडी, चतु:शृंगी, येरवडा, चंदननगर पोलीस ठाण्याच्या परिसरात चंदन चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक निलेश घोरपडे, अरविंद कुमरे, सचिन रणदिवे आणि सुहास निगडे यांच्या पथकाने केली आहे