Chakan News: (पुणे) : पुणे- नाशिक महामार्गावर नाशिकहून पुणे बाजूकडे जाणाऱ्या एका शिवशाही एसटी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. शनिवारी (ता. १७) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.एसटी बसला आग लागल्याची घटना घडली आहे.(Chakan News)
एसटी बसला आग लागल्याची घटना घडली आहे.
अग्निशमन विभागाच्या जवानांनी अर्धा तासाच आटोक्यात आणली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नाही. मात्र बसचे सुमारे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले. आग लागल्यानंतर हवेत धुराचे लोट पसरले होते. तसेच चाकण औद्योगिक क्षेत्रातील मुख्य चौकात बघ्यांची एकच गर्दी केली होती.(Chakan News)
याप्रकरणी बसचे चालक दीपक प्रकाश निकाळे (वय -४०,रा. मानखुर्द, मुंबई) यांनी चाकण पोलिसात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे- नाशिक महामार्गावर नाशिकहून पुणे बाजूकडे शिवशाही एसटी बस निघाली होती. यावेळी चाकण परिसरात सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आली त्यावेळी चालकाला धुराचे लोट तसेच बसचे इंजिन गरम झाल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने बस बाजूला घेतली.(Chakan News)
आग लागल्याचे लक्षात येताच प्रवासी बसमधून उतरले. याबाबत चाकण नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागास कळविण्यात आले. बंबाने आग दहा मिनिटात आटोक्यात आणली. या ठिकाणी चाकण पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी तसेच वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते. आग लागल्यानंतर वाहतूक कोंडी सुमारे एक तास झाली.
दरम्यान, शिवशाही एसटी बसच्या मागील दोन्ही चाकातील ड्रम जाम झाल्याने आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आगीमध्ये बसच्या मागील बाजूच्या दोन्ही चाकांचे टायर, दोन्ही बाजूच्या काचा फुटल्या तसेच आतमधील खुर्च्यांचे कुशन जळाले. अशी माहिती वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्र आदलिंगे यांनी दिली.