पिंपरी : खासगी सुरक्षा एजन्सी चालविण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसताना सुरक्षा गार्ड नेमल्या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
रविशंकर अनिल सिंग (रा. शिवगणेशनगरी, धावडेवस्ती, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंग हा खासगी सुरक्षा एजन्सीचा मालक असून त्याने भोसरी एमआयडीसीतील कंपनीत बेकायदेशीररीत्या सुरक्षा गार्ड नेमले होते. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस अधिक तपास करत आहेत.