Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

२० हजाराच्या कर्जापोटी तब्बल ५ लाखाची वसुली करणाऱ्या महिला सावकाराच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 14 July 2022, 20:54
Three people arrested for beating bus driver in kasarwadi pimpri chinchwad Pune

कर्जत : सावकारिची अनेक किचकट प्रकरणे आजपर्यंत आपण पाहिली असतील पण, एका महिला सावकाराने वसुल केलेल्या सुलतानी व्याजाच्या रकमेच्या आकडयाने कर्जत पोलीसही चक्रावून गेले आहेत.

मुद्दलपोटी दिलेल्या २० हजारांच्या रकमेपोटी तब्बल ५ लाख रुपयांचे व्याज देऊनही या महिला सावकाराचे समाधान झाले नाही.
कोरोनाच्या काळात व्याजाची रक्कम देऊ न शकणाऱ्या एका कापड व्यापाऱ्याला व्याज व मुद्दलीच्या रकमेसाठी चक्क शिवीगाळ व मारहाण करण्याची घटना घडली आहे.

याबाबत भगवान अर्जुन काकडे (रा.काकडेगल्ली, कर्जत) यांच्या फिर्यादिवरून महिला सावकारासह तिच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली विजय राऊत व तिचा मुलगा नाव रा.राशीन ता.कर्जत अशी गुन्हा दाखल झालेल्या खाजगी सावकारांची नावे आहेत.

 

फिर्यादीचा कपडे विक्रीचा व्यवसाय असून सन २००० साली परिस्थिती हालाखीची असल्याने वैशाली राऊत हिच्याकडून २० हजार रुपये ५ रुपये टक्के दराने घेतले होते.

फिर्यादीने व्याजापोटी दर महिन्याला २ हजार रूपये भाजीविक्री करून सावकाराकडे जमा केले. मात्र सन २०१९ पासून कोरोना महामारीमुळे सर्व कामकाज ठप्प झाल्याने व फिर्यादीच्या मुलीचे शिक्षण सुरू असल्याने सावकाराला व्याज देऊ शकले नाहीत.
दि.८ मे रोजी सावकाराने फिर्यादीच्या मुलीच्या फोनवर संपर्क करून ‘तुम्ही घेतलेले पैसे का देत नाहीत? मुद्दल व व्याजाचे पैसे देऊन टाका उगाच वाद नको’ असे सांगितले.

यावर फिर्यादीने मी आत्तापर्यंत तुम्हाला ५ लाख रुपये दिले आहेत. पण थोडे दिवस थांबा पैसे आल्यावर मी तुमचे पैसे देऊन टाकतो’ असे समजावले.त्यानंतर दि.२७ जून रोजी फिर्यादी कर्जतच्या बाजारात असताना माझे पैसे परत दे असे म्हणत महिला सावकाराने शिवीगाळ दमदाटी करून सर्वांसमोर गोंधळ घालून राडा घातला.

त्यानंतर दि.४ जुलै रोजी फिर्यादी व त्यांची पत्नी बाजारात जात असताना त्यांना अडवून ‘व्याजाचे पैसे व मुद्दल दे’ असे म्हणत महिला सावकार वैशाली राऊत व तिच्या मुलाने शिवीगाळ करून तोंडावर झापड मारून मारहाण केली.त्यावेळी पत्नी सोडवण्यास आली असता तिलाही शिवीगाळ मारहाण केली.’तू जर पैसे दिले नाही तर तुम्हाला पाहून घेऊ’ अशी धमकी देऊन शिवीगाळ करून गोंधळ घालून निघून गेले.

त्यांचे पैसे देण्याचा फिर्यादीने प्रयत्न केला पण रक्कम उपलब्ध झाली नसल्याने ते रक्कम देऊ शकले नाहीत.मात्र वारंवार व्याजाच्या रकमेसाठी त्रास देत असल्याने दोघांविरोधात कर्जत पोलिसात अखेर फिर्याद दिली आहे. कर्जत पोलिसांनी महिला सावकार व तिच्या मुलाविरोधात ३४१, २९४, ३२३, ५०६, ३४ तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम ३९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच पोलीस जवान सलीम शेख भाऊ काळे मनोज लातूरकर ईश्वर माने शाहुराज तिकटे आदींनी केली आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्ग आता होणार सहापदरी! साडेपाच तासांचा प्रवास आता होणार सुसाट

Tuesday, 28 July 2026, 22:56

पुण्यातील थरारक प्रकार! कॅशियर वाटेत अडवलं; डोळ्यात स्प्रे मारून लुटले ८ लाख रुपये

Tuesday, 28 July 2026, 22:26

“नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन उभं करू…” अभिजित दीपिकेचा केंद्र सरकारला इशारा; नेमकं काय घडलं?

Tuesday, 28 July 2026, 21:59

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; ‘ब्रँड पुणे’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

Tuesday, 28 July 2026, 21:09

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54
Next Post

खुशखबर!  पुणे-सोलापूर इंद्रायणी एक्स्प्रेस सोमवारपासून पुन्हा नागरिकांच्या सेवेत...! 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.