यवत : पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस (ता. दौंड) येथील टोलनाक्यावर वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल वसूल केल्याप्रकरणी प्रकल्प प्रमुखासह तीन जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटस टोल नाक्यावरील प्रकल्प प्रमुख अजित सिंग ठाकूर यांच्यासह चार जणांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकार आहे.
वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल घेऊ नये. असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असताना देखील पाटस टोलनाक्यावरून टोल घेतला जात होता. याबाबतचे वृत्त एका वृत्त वाहिनीने दिले होते. त्यानंतर यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सूत्रे हलवून वरील कारवाई केली आहे.