औरंगाबाद : रात्रपाळीवर असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास एका घरात घुसून महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी औरंगाबाद शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्तावर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना शनिवारी (ता. १४) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
विशाल ढुमे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहायक पोलीस आयुक्ताचे नाव आहे. या घटनेमुळे औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढुमे हे नाईट ड्युटीवर असताना रात्री एका हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. या वेळी त्यांचा मित्र देखील सोबत होता. यावेळी त्याची पत्नी देखील सोबत होती. ढुमे याच्याकडे गाडी नसल्याने मला लिफ्ट मिळेल का? अशी विनंती ढुमे यांनी मित्राला केली. मित्राने त्यांना सोडण्यास होकार दिला. त्यांनी त्यांना गाडीत बसवले. मित्र आणि त्याची पत्नी ही कारमध्ये पुढे बसले होते. ढुमे हे गाडीत दारूच्या नशेत असल्याने त्यांनी त्याच्या मित्राच्या पत्नीची गाडीत छेड काढली. ढुमे याने महिलेच्या पाठीवरून हात फिरवत मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
दरम्यान, मला वॉशरूमला जायचे असून, तुमच्या घरी घेऊन चला असे ढुमे यांनी मित्राला सांगितले. घरी गेल्यावर तुमच्या बेडरूम मधला वॉशरूम मला वापरायचा आहे, म्हणत ढुमे याने तिथेही महिलेशी गरीवर्तन केले. याला मित्राने विरोध केला तर त्याने त्याला देखील मारहाण केली. यामुळे त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठत ढुमे याच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.