Buldhana News : बुलढाणा : शिक्षण क्षेत्रातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका वरिष्ठ लिपिकास एक लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. बुलढाण्यातील मलकापूर बस स्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. नेमणुकीला शिक्षण विभागाची मान्यता मिळवून देण्यासाठी ही लाच घेतली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील प्रकार
विलास सोनुने (५२, नंदनवन नगर, मलकापूर, जि. बुलढाणा) असे (Buldhana News) लाचखोर लिपिकाचे नाव असून तो मलकापूर येथील गोंविंद महाजन शाळेत वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथीलच रहिवासी तक्रारदाराच्या भावाचा अनुकंपा तत्त्वावरील नेमणुकीला शिक्षणाधिकारी यांची मान्यता मिळवून देतो, असे सोनुने यांनी सांगितले.
ही मान्यता मिळवून देण्यासाठी तक्रादार याना सोनुने यांनी २ लाख रुपयांची मागणी केली. याला वरकरणी होकार देऊन तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. (Buldhana News) यावरून विभागाच्या पथकाने सोमवारी संध्याकाळी उशिरा मलकापूर बसस्थानकमधील रसवंतीजवळ लाखाची रक्कम स्वीकारताना सोनुने यास रंगेहात पकडले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे शहरात घरफोड्यांचे सत्र सुरुच..