दिनेश सोनवणे
दौंड : बाजरी पिकात गुरे का चारली असे म्हणुन भावाला काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक गार येडेवस्ती (ता. दौड) येथे रविवारी (ता.२) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी भाव, भावजय व पुतण्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बाल शामराव विटकर (वय- ४८, व्यवसाय-मजुरी, रा- गार येडेवस्ती, ता दौड. जि. पुणे) यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार बालचा भाऊ अशोक शामराव विटकर, त्याची बायको संगिता अशोक विटकर आणि पुतण्या आशितोष अशोक विटकर (सर्व रा. गार येडेवस्ती, ता. दौड) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाल विटकर हे एक शेतमजूर आहेत. तर बाल विटकर यांचे आरोपी हे नात्याने भाऊ, भावजय व पुतण्या आहेत. रविवारी (ता.२) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आरोपींनी बाल विटकर यांनी आम्ही वाटयाने केलेल्याबाजरी पिकात गुरे का चारली, असे म्हणुन आरोपीनी काठीने, हाताने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी केली.
याप्रकरणी बाल विटकर यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी, पुढील तपास पोलीस हवालदार मिसाळ करीत आहेत.