पुणे : पुण्यातील पाषाण परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पत्नीने जेवणात चिकन दिले नाही म्हणून बापाने चिडून लहान मुलीच्या डोक्यात वीट घालून जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना पाषाण येथील वाकेश्वर रस्ता परिसरातील पूनम बेकरीजवळ घडली आहे.
या प्रकरणी महिलेचे वडील रघुनाथ लाला पवार (रा. पंचवटी, पाषाण) यांन चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी विकास नागनाथ राठोड (रा. वाकेश्वर रस्ता, पाषाण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीवरून, विकास राठोडला सोमवारी रात्री पत्नीने जेवण दिले होते. मात्र, जेवणात चिकन दिले नसल्याने चिडून त्याने लहान मुलीच्या डोक्यात वीट मारली. त्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विकास नागनाथ राठोड (रा. वाकेश्वर रस्ता, पाषाण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चतुरशृंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.