सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे लाचखोर शिक्षण अधिकारी किरण लोहार यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. पंचवीस हजारांची लाच घेताना ३१ ऑक्टोबर रोजी किरण लोहार यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानंतर राज्य शासनाच्या वतीने किरण लोहार यांचे निलंबनाचे आदेश देण्यात आले होते.
वर्गवाढीसाठी युडायस प्लसचा प्रस्ताव शिक्षण संचालकांना पाठविण्यासाठी २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या अडचणीत वाढ झाली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्या जामिनावर आज युक्तीवाद पार पडला. थोड्यात वेळात निर्णय होईल.
तत्पूर्वी शिक्षण सचिवांनी लोहारांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. कोट्यवधींचा बंगला, प्लॅट, फ्लॉट व दागिने लोहारांकडे सापडले आहे. आता पुणे लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षकांनी त्यांच्या खुल्या चौकशीला परवानगी दिली आहे. त्यामुळे त्यांनी कुठे कुठे पैसे गुंतवले आहेत हे समोर येणार आहे.
तत्पूर्वी, २०१३ मध्ये शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झालेलेल्या लोहारांची आता लाचखोरीची चौकशी होईपर्यंत सेवेतून हकालपट्टी केली आहे. दरम्यान, लाचलुचपतच्या चौकशीत त्यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता आढळल्यास त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.