Breaking News : पुणे : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथील एका शेतकऱ्याला पेशाने वकील असलेल्या एका व्यक्तीने रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. (Breaking News)
राजेंद्र दिनकर चव्हाण, वाडेबोल्हाई (ता. हवेली) असे मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर मारहाण करणाऱ्या वकिलाचे नाव अद्याप समजू शकले नाही. (Breaking News)
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे दालन असलेल्या पाचव्या मजल्यावर हि घटना घडली आहे. वकील तरुणाकडून शेतकऱ्याला मारहाण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली असून विरोधी पक्षकाराच्या वकिलाने दमदाटी केल्याचा शेतकऱ्याचा आरोप आहे. तर तर स्वसंरक्षणासाठी मारहाण केल्याचा दावा वकिलाने केला आहे. (Breaking News)
दरम्यान, शेतकऱ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण झाल्याची घटना घडली असून बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. (Breaking News)