Breaking News : मुंबई : मुंबईवर पुन्हा एकदा २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करणार, अशा धमकीचा संदेश मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाकडे आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवत सोमवारी तपास सुरू केला आहे. या धमकीच्या संदेशानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
वरळी पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षात १२ जुलैला सायंकाळी साडेचारच्या सुमारास व्हॉट्सअॅप संदेश आला. त्यात आमचे काही शूटर भारतीय असून, यूपी सरकार व मोदी सरकार आमच्या निशाण्यावर आहेत. (Breaking News) तसेच काही ठिकाणी काडतुसे व एके ४७ आहेत. मुंबईत पुन्हा २६/११ प्रमाणे दहशतवादी हल्ला करणार या आशयाचा मजकूर नमूद होता.
दरम्यान, धमकीचा हा संदेश आखाती देशातून आल्याचे समोर येत आहे. धमकी देणारा मध्यप्रदेशचा रहिवासी आहे. तो कामगार असून, सध्या कामानिमित्त आखाती देशात आहे. संदेश पाठविणाऱ्या मोबाइलधारकाविरुद्ध वरळी पोलिसांनी धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. (Breaking News) वाहतूक नियंत्रण कक्षाच्या सहायक पोलिस निरीक्षक शुभांगी अशोक ढगे (३४) यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवला. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, पाठविण्यात येत असलेले संदेश मध्यप्रदेशचा रहिवासी असलेला तरुणच पाठवत असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, तो आखाती देशात असल्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होत आहेत. सध्या शासनस्तरावर त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असून, त्याच्या चौकशीतन अशा धमकीच्या संदेशांना ब्रेक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मध्य प्रदेशमध्ये अशाच प्रकारचे संदेश पाठविल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे. (Breaking News) भारतात कुठेही काही घडामोड झाल्यास तो अशा प्रकारचे संदेश पाठवत असल्याचा संशय एका अधिकाऱ्याने वर्तवला आहे.
या धमकीच्या मेसेजमध्ये मुंबईमध्ये हल्ला करण्यासोबतच योगी आणि मोदी यांनाही लक्ष्य करणार असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी याबाबत अधिक तपास सुरू केला आहे. (Breaking News) वरळी पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षात १२ जुलैला हा मेसेज आला होता. हा मेसेज सायंकाळी साडेचारच्या सुमारास आला असून, तो आखाती देशातून आल्याचे म्हटले जात आहे.
पोलीस सध्या याप्रकरणी अधिक तपास करत असून, पोलीस या तरुणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्या चौकशीनंतर अशा धमकीच्या प्रकरणांमध्ये घट होण्याची शक्यता आहे.