हडपसर : हडपसर जवळील शेवाळवाडी गावात मंगळवारी (ता. १३) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास १९ वर्षीय दोन मैत्रिणींनी अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
आत्महत्या केलेल्या दोन तरुणी पैकी एकीने गळफास लावून तर दुसरीने पाचव्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या केल्याने शेवाळवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आकांक्षा औदुंबर गायकवाड (वय- १९) व सानिका हरिश्चंद्र भागवत (वय- १९) अशी आत्महत्या केलेल्या दोन मैत्रिणींची नावे असून वरील धक्कादायक प्रकार शेवाळवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ अभिनंदन क्रिस्टल टॉवर या इमारतीत सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
आकांक्षा व सानिका या दोघीही मैत्रिणी होत्या. सात वाजण्याच्या सुमारास सानिका हिने राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.
दरम्यान, सानिकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबुलनन्स मध्ये घेऊन जात असताना आकांक्षाने पहिला. त्यानंतर आकांक्षाने पाचव्या मजल्यावरून उडी मारली. आणि ती रुग्णवाहिकेजवळ पडली. यातच तिचा मृत्यू झाला. दोघींच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात