पुणे – भारत पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी व वाहातुकदार यांच्यातील संगणमताने मागिल आठ महिन्यापासुन मोठ्या प्रमानात इंधन चोरी असल्याचे ठोस पुरावे पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या हाती लागले असुन, पोलिसांनी या प्रकरणातील ‘लोणी” कोणी व किती खाल्ले याची सखोल चौकशी सुरु केली आहे.
या प्रकरणात पोलिसांच्या रडारवर असणारे कंपनीचे संशयित अधिकारी व संशयित वाहातुकदारांच्या बॅंक निहाय आर्थिक व्यवहाराची माहिती घेण्याचे काम पोलिसांच्याकडुन सुरु केले आहे. यातुन अनेक मोठे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार, पोलिस या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन, काम करणार असल्याची ग्वाही एका वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांने “पुणे प्राईम न्यूज” ला दिली आहे.
पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पुर्व हवेलीमधील तेल कंपण्याच्या डेपोतुन इंधन चोरी होत असल्याच्या संशयावरुन, महिनाभऱापुर्वी तरडे परीसरात कारवाई केली होती. या कारवाीची चौकशी अद्यापही चालु असुन, पोलिसांनी मागिल महिनाभऱात भारत पेट्रोलियम कंपणीच्या डेपोमधील तब्बल एकविस टॅंकर चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. जप्त केलेल्या बहुतांश टॅंकरमध्ये चोर कप्पे असल्याचा संशय पोलिसांना असुन, या गोरख धंद्यात भारत पेट्रोलियम कंपणीचे कांही वरीष्ठ अधिकारी सहभागी असल्याचा संशयावरुन पोलिसांनी संशयित अधिकारी व वहातुकदारांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे.
याबाबत एका वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, तरडे येथील भारत पेट्रोलियम कंपणीच्या डेपोमधुन होत असलेल्या इंधन चोरीबाबत आत्तापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासात अनेक धक्कादायक व संशयित बाबी पुढे आल्या आहेत. कंपनीत पेट्रोल व डिझेल टॅंकरमध्ये भरण्यासाठी फुल अॅटोमायझेशन असतानाही, बादल्यांचा मोठा वापर झाल्याचे दिसुन आले आहे. यातुन मागिल आठ महिन्याच्या काळात कोट्यवधी रुपयांची इंधनचोरी झाली असावी असा संशय पोलिसांना आहे.
दरम्यान, कंपनीचे अधिकारी तपासाला सहकार्य़ करण्याऐवजी आडमुठेपणाने वागत आहेत. पोलिसांनी वाहातुकदार व अधिकारी या दोघांच्याही बॅंक व्यवहाराची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. यातुन खुप मोठी माहिती मिळण्याची शक्यता आहे. या तपासाकामी गरज भासल्यास, आयकर विभागाचीह मदत घेतली जाणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ठ केले आहे.