Breaking News | लोणावळा, (पुणे) : मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर उर्से टोल नाक्याजवळ कारने ट्रकला पाठीमागून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (ता. १७) सकाळी पाऊणे आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अतिशय भीषण असा हा अपघात आहे.
उर्से टोल नाक्याजवळ कारची ट्रकला पाठीमागून धडक…
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली कारने ट्रकला मागून जोरात धडकली. यामध्ये जवळपास अर्धी कार ट्रकच्या मागील बाजुने ट्रकखाली गेली. चालकासह तिघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती समजताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा व महामार्ग पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने वाहने बाजुला करत कार मधील सर्वांना बाहेर काढले.
दरम्यान, अपघातात अर्धी कार ट्रकखाली गेली. यामुळे कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Beauty Tips : मुलायम आणि चमकदार त्वचा बनविण्यासाठी गुलाब फायदेशीर, जाणून घ्या कसा करावा वापर
Sassoon Hospital : आरोग्य व्यवस्थेवर ताण ! ससून रुग्णालयाने घेतला ;हा’ महत्वाचा निर्णय
H3N2 virus : शहरात H3N2 चा पहिला बळी; आमदार लांडगे अधिवेशनातून माघारी