Bogus Certificate | पुणे : टीईटी घोटाळ्या पोठापाठ आता पुण्यात बोगस प्रमाणपत्र घोटाळा समोर आला आहे. बनावट वेबसाईट तयार करून त्याद्वारे तब्बल 700 जणांना दहावी पासचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस आले आहे.गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी छत्रपती संभाजी नगरच्या एका टोळीच्या मुस्क्या आवळल्या आहेत.
याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कृष्णा सोनाजी गिरी, अल्ताफ शेख, सय्यद इमरान सय्यद इब्राहिम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाला दहावी नापास विद्यार्थ्यांना पास असल्याचे बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली तेव्हा पोलीसांनी एका बनावट ग्राहकाच्या मदतीने संदीप ज्ञानदेव कांबळे याच्याशी संपर्क साधला.
तेव्हा कांबळे याने दहावी पासच्या प्रमाणपत्राला ६० हजार रुपये लागतील असे सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने काही पैसे भरून सापळा रचण्यात आला. सुरुवातीला ३९ हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर उरलेले १६ हजार रुपये घेण्यासाठी संदीप कांबळे हा स्वारगेटला बोलावले. तेव्हा त्याला सापळा रचून पकडण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने इतर आरोपींच्या सहभागाची कबूल केली. याप्रकरणी पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतले.
छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र स्टेट ओपन स्कुल सुरु करण्यात आली आहे. या टोळीने त्यांच्यासारखीच दिसेल अशी वेबसाईट २०१९ पासून सुरु केली. या टोळीने दहावी पास असलेल्याचे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या तपासात ३५ जणांना त्यांनी १० वी पासचे प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले होते.
या वेबसाईट व त्यांच्या कारनाम्याची तपासणी केल्यानंतर त्यांनी आतापर्यंत ७०० जणांना अशा प्रकारे बनावट १० वी, १२ वी पासचे प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime | दारुड्या वडिलांचा मुलाकडून डोक्यात दगड घालून खून ; मुळशीतील घटना, आरोपी अटकेत