पुणे : तंबाखू खायला आईने पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात घडली. जुन्नर पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकणी आरोपीचे वडील बारकु सखाराम खिलारी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
अमोल बारकु खिल्लारी (वय. 23) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अंजनाबाईक बारकु (वय.६०) असे हत्या करण्यात आलेल्या आईचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अंजनाबाई यांचा मुलगा अमोल याने त्यांच्याकडे तंबाखू विकत घेण्यासाठी पैसे मागितले. मात्र अंजानाबाई यांनी मुलाला पैसे देण्यास नकार दिला. या गोष्टीचा अमोला राग आला. रागाच्या भरात अमोलने आईच्या डोक्यात फावड्याने घाव घातला आणि अंजनाबाई गंभीर जखमी झाल्यात आणि त्याच दरम्यान त्यांच्या मृत्यू झाला.
दरम्यान, आईच्या डोक्यात खोरे घालून मुलाने आईची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडली आहे. याप्रकणी अमोलच्या वडिलाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी अमोला अटक केली असून या घटनेचा पुढील तपास जुन्नर पोलीस करीत आहेत.