मोठी बातमी | भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या (वळपाडा) परिसरात तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली ४० ते ५० रहिवाशी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कैलासनगर येथे वर्धमान कंपाऊंडमध्ये ही दुर्घटना झाली आहे.
भिवंडी शहरातील वलपाडा परिसरात एक तीन मजली इमारत अचानक कोसळली. या दुर्घटनेत ५० ते ६० जण या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाला दिली. त्यानंतर या विभागांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले आहेत. ग्राउंड फ्लोअर आणि दोन मजले अशी इमारत होती. अग्निशमन वाहने आणि एनडीआरएफ, पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. भिवंडी अग्निशामक दालाच्या जवानांनी तेथील ढिगारा हटविण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे.
आतापर्यंत इमारतीत अडकलेल्या एकाही व्यक्तीला बाहेर काढण्यात आलेले नाही. त्यामुळे जिवीतहानीची भीती व्यक्त करण्यात येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ढिगार्याखालून एक महिला आणि लहान बाळाला बचाव पथकाने नुकतेच सुखरुप बाहेर काढले आहे. मात्र, अद्यात ढिगार्याखाली ३० ते ३५ जण अडकल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शींकडून वर्तवण्यात येत आहे.
या दुर्घटनेनंतर ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने खबरदारी म्हणून ठाण्यातून सात ते आठ रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime : ;तू मला ओळखत नाही का, मी तळेगावचा भाई; म्हणत तरुणाचा चायनिज सेंटरवर कोयता घेऊन गोंधळ