मुंबई : मुंबई विमानतळावर खराब हवामानामुळे विमान क्रॅश झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेनंतर मुंबई विमानतळावरील विमानांची टेक ऑफ आणि लँडिंग बंद करण्यात आली आहे. हे विमान खासगी असून, विशाखापट्टणम येथून मुंबईला आले होते. विमानात ६ जणांसह २ क्रू मेंबर्स होते. या अपघातात आतापर्यंत तीन जण जखमी झाले असून, इतर जण सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे. ही घटना आज संध्याकाळी ५ वाजून २ मिनिटांनी घडली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विशाखापट्टणमच्या विझाग येथून निघालेले विमान मुंबई विमानतळावर लँडिंग करत असताना प्रचंड पाऊस पडत होता. खराब हवामानामुळे जमिनीपासून अवघ्या काही अंतरावर असताना हे विमान क्रॅश झाले. या घटनेमुळे विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस, एयरपोर्ट अथॉरिटी टीम, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षा पथकांनी तातडीने विमानात असलेले क्रू-मेंबर्स आणि इतर नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले. अपघातग्रस्त विमानातून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आल. या विमान अपघातात तीन जण जखमी झाले. तर पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.