Big News : सातारा : कुरोली व बनपुरी येथील भाविक बाळूमामाचे देवस्थान असलेल्या लाकरेवाडी येथे देवदर्शनासाठी जात होते. या वेळी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील धोंडेवाडीजवळील सुर्याजीवाडी हद्दीत कार रस्त्याच्या कडेच्या झाडावर जोरात आदळून अपघात झाला. या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले, तर चौघेजण गंभीर जखमी झाले. धोंडेवाडी (ता. खटाव) येथील पेट्रोल पंपानजीक सूर्याचीवाडी हद्दीत पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ओमिनी कार झाडावर आदळून हा भीषण अपघात झाला.
भीषण अपघात
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पांडुरंग देशमुख (रा. सिद्धेश्वर कुरोली) यांच्या ओमिनी कारमधून कुरोली व बनपुरी येथील भाविक बाळूमामाचे देवस्थान असलेल्या लाकरेवाडी येथे देवदर्शनासाठी जात होते. या वेळी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास खटाव तालुक्यातील धोंडेवाडीजवळील सुर्याजीवाडी हद्दीत कार रस्त्याकडेच्या झाडावर आदळून अपघात झाला. कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पहाटेच्या वेळी हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. अपघाताचा तपास वडूज पोलीस करत आहेत. (Big News)
दरम्यान, वडूज पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविले. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे अद्याप स्पष्ट झाली नाहीत; मात्र, हे सर्वजण बनपुरी व कुरोली येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
या भीषण अपघातात एक पुरुष व तीन महिला जागीच ठार झाल्या. जखमींना वडूज आणि सातारा येथील रुग्णालयांमध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरु असताना वडूज येथील रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये दहिवडी येथील एका प्रवाशाचा समावेश आहे. (Big News)