Big News : नाशिक : पुण्यातील ससून रुग्णालयातून तीन दिवसांपूर्वी ललित पाटील हा कुख्यात ड्रग तस्कर फरार झाला होता. त्यानंतर कैद्यांकडून बिनदिक्कतपणे होणाऱ्या ड्रग तस्करीची चर्चा होत असतानाच, नाशिक जिल्ह्यातील शिंदे गावाजवळ साकीनाका पोलिसांनी मोठी कारवाई करत, तब्बल २५० ते ३०० कोटींच्या अंमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त केला. एवढेच नव्हे तर १३३ किलो एमडी पोलिसांनी जप्त केला. अधिक माहिती घेतली असता, ड्रगची निर्मिती करणारा हा कारखाना ड्रग तस्कर ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याच्या नावावर असल्याचे उघड झाले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
१३३ किलो मेफेड्रोन जप्त
ललित पाटील हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील असून, भूषण पाटील हा त्याचा भाऊ त्याला साथ देत असल्याचे या तपासणीदरम्यान उघड झाले आहे. अंमली पदार्थांची विक्रीच नाही तर मेफेड्रोनसारखा अंमली पदार्थ तयार करण्यात हातखंडा असलेला ललित पाटील ससून रुग्णालयात कैद्यांसाठी असलेल्या १६ नंबरच्या वॉर्डमधून तीन दिवसांपूर्वी पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता. (Big News) या वॉर्डभोवती पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा चोवीस तास पहारा असतो. असे असतानाही तो इथून ड्रग रॅकेट चालवत होता. पोलिसांचा खडा पहारा असताना देखील कोट्यवधी रुपयांचं मेफेड्रोन ससूनच्या १६ नंबर वॉर्डमधील ललित पाटीलकडे बिनदिक्कतपणे पोहचत होतं. या मेफेड्रोनचे व्यवहार करण्यासाठी अनेक मोबाईल फोन देखील त्याच्याकडे उपलब्ध होते. या घटनेनंतर महाराष्ट्राला हादरा बसला. पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली.
दरम्यान, नाशिकमध्ये साकीनाका पोलिसांची तीन दिवस कारवाई सुरू होती. नाशिकमध्ये गणेशाय इंडस्ट्रीजच्या नावाने हा कारखाना सुरू होता. ज्यामध्ये ड्रगची निर्मिती केली जात होती. (Big News) या वेळी पोलिसांना ड्रग्स बनवण्यासाठी लागणारे तब्बल दीडशे कोटींचे कच्चे साहित्य सापडले. पोलिसांनी कारखाना उद्ध्वस्त केला. याचबरोबर मालकासह कामगारांना ताब्यात घेतले.
ड्रग निर्मिती करणारा हा कारखाना ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याच्या नावावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याच्यासह त्याच्या कामगारांना पोलीसांनी ताब्यात घेतले. (Big News) कारखान्यात सापडल्या गेलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे अडीचशे कोटी एवढी होती. भूषण पाटील हा ललित पाटील याला साथ देत असल्याचेही यामुळे उघड झाले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big news : पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात तीन महिलांचाही सहभाग; गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट
Big News : अजित पवार पुणे जिल्ह्याचे नवे पालकमंत्री; तर सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील