Big News : पुणे : ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. ससून रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची टीम असताना देखील रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर हे स्वतः ललित पाटीलवर उपचार करत असल्याचे रजिस्टरवरून यापूर्वीच निदर्शनाला आले होते. त्यामुळे ठाकूर यांच्या कृपेनेच ललित पाटील तब्बल ९ महिने ससून रुग्णालयात उपचार घेत असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. आता डीन ठाकूर ललित पाटीलवर मेहरबान असल्याचा धक्कादायक पुरावा समोर आला आहे. ललित पाटीलला टीबी झाल्याचे ससूनच्या डीनचे पत्र हाती आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. या पत्रामुळे ललित पाटीलचा रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी डीन ठाकूर स्वतः पाठपुरावा करत असल्याच्या चर्चांना बळ मिळत आहे.
ललित पाटीलचा रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी डीन स्वतः पाठपुरावा करत असल्याची चर्चा
ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला हर्णिया झाल्याचे कारण देत त्याच्यावर उपचार सुरू होते. साधारणपणे या आजाराचे रुग्ण चार ते पाच दिवस उपचार घेऊन घरी जातात. मात्र, याच आजाराच्या कारणास्तव ललित पाटील ससूनमध्ये तळ ठोकून बसला होता. ललित पाटीलचा रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी डॉक्टर संजीव ठाकूर यांनी ललित पाटीलला टी. बी. झाल्याचे पत्र मागील महिन्यात ससुनच्या वैद्यकीय अधीक्षकांना लिहिले होते. ७ सप्टेंबर २०२३ रोजी हे पत्र लिहिल्याचे दिसत आहे. (Big News) या पत्रात संजीव ठाकूर यांनी ललित पाटीलला टी.बी. झाला असून, पाठदुखीचा त्याचबरोबर लठ्ठपणाचा देखील त्रास असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. ललित पाटीलची माहिती घेण्यासाठी येरवडा कारागृहाकडून विचारणा झाल्यानंतर डॉक्टर संजीव ठाकूर यांनी ललित पाटीलला टी. बी. झाल्याचे उत्तर या पत्रात दिले आहे. दरम्यान, तीन वर्षांच्या कालावधीत ललित पाटीलला अनेक आजार झाल्याचे ससून रुग्णालयाने दाखवले आहे.
दरम्यान, ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी त्याला वेगवेगळे आजार असल्याचे कागदोपत्री दाखवण्यात येत होते. (Big News) अनेकांची फूस असल्यामुळेच त्याला नऊ महिने ससून रुग्णालयात बसून ड्रग्ज रॅकेट चालविणे शकय झाल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या तीन वर्षांत ललित पाटीलला झालेल्या आजारांची यादी
– ललित पाटील हिंजवडी पोलीस स्टेशनमधील जिन्यावरून पडल्याचे कारण देत त्याला १२ डिसेंबर २०२० रोजी ससून रुग्णालयात भरती करण्यात आले.
– हर्निया झाल्याचे सांगून रुग्णालयातील मुक्काम वाढवण्यात आला.
– पुढे त्याला पाठदुखीचा आजार जडल्याचा दावा डॉक्टरांनी केला.
– ललित पाटीलला लठ्ठपणाचा त्रास आे. त्यामुळे बॅरिएट्रिक सर्जरी करण्याची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.
– ललित पाटीलला सप्टेंबर महिन्यात टी. बी. झाल्याचे जाहीर.
– पुढे हर्नियाचे ऑपरेशन करायचे असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, हर्निया या आजारावर उपचारासाठी चार महिने लागत नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे ससूनचे डीन संजीव ठाकूर हेच ललित पाटीलला साथ देत असल्याच्या चर्चेला बळकटी मिळत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : ITR भरणाऱ्यांच्या संख्येत 90 टक्क्यांची वाढ; 2021-22 मध्ये संख्या 6.37 कोटींवर
Big News : मराठा आरक्षणाला पाठिंब्यासाठी शिंदे गटाच्या खासदाराने दिला राजीनामा
Big News : साखळी बॉम्बस्फोटांनी केरळ हादरले! कन्वेंशन सेंटरमध्ये टिफिनमध्ये ठेवला होता बॉम्ब