पुणे : गुजरातमधून एक वाईट बातमी मिळत आहे. मोरबी येथील माच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळल्याने तब्बल ५०० जण बुडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.आतापर्यन्त ६० नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
बचाव पथकाने काही नागरिकांना नदीतून बाहेर काढले आहे. त्यांना जवळील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तर काही नागरिकांचा शोध सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे मोठी हानी झाली आहे. गुजरातमधील मोरबी येथे माच्छू नदीवर छठ पूजासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
पाच दिवसांपूर्वी या पुलाच्या दुरुस्थीचे कम करण्यात आले होते. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला होता. मात्र, पाच दिवसानंतर आज ही मोठी दुर्घटना घडली. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
रविवार सुट्टी असल्याने या पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या घटनेबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दुख: व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेबद्दल दुख: व्यक्त केले आहे. त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे.
रविवारी ही मोठी दुर्घटना घडली. केबल पुलावर तब्बल पाचशे पेक्षा जास्त नागरिक होते. हा पूल नदीत कोसल्याने पूलावरील सर्व नागरिक बुडल्याची माहिती मिळत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य वेगानं सुरु करण्यात आले आहे. रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.