उत्तराखंड : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील द्रौपदी का डांडा-२ या शिखराजवळ झालेल्या हिमस्खलनामुळे ट्रेकर्सचा १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर १८ हून अधीक जण अद्यापही बेपत्ता आहेत.
Uttarakhand | SDRF teams leave from Sahastradhara helipad in Dehradun to rescue the trainees trapped in an avalanche in Draupadi’s Danda-2 mountain peak pic.twitter.com/kYRRgLAwwh
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 4, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण उत्तरकाशीच्या नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंगच्या ट्रेकिंग ग्रुपमधील आहेत. यामध्ये ३३ प्रशिक्षणार्थी आणि ७ प्रशिक्षकांचा समावेश होता. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळी बचावकार्यासाठी रवाना झाली. भारतीय हवाई दलाने बचावकार्यासाठी दोन चिता हेलिकॉप्टर्स तैनात केले आहेत.
द्रौपदी का डांडा-2 पर्वत चोटी में हिमस्खलन में फंसे प्रशिक्षार्थियों को जल्द से जल्द सकुशल बाहर निकालने के लिए NIM की टीम के साथ जिला प्रशासन, NDRF, SDRF, सेना और ITBP के जवानों द्वारा तेजी से राहत एवं बचाव कार्य चलाया जा रहा है।
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) October 4, 2022
मुख्यमंत्री धामी यांनी ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार “हिमस्सखलन झाल्याने नेहरु माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटचे प्रशिक्षणार्थी अडकले आहेत. मी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे लष्कराच्या मदतीने वेगाने बचावकार्य करण्यासाठी विनंती केली आहे. त्यांनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे”.