पुणे : Big Breaking – पुणे शहरातील कोंढवा परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दिराने वाहिणीसह दोन पुतण्यांना जिवंत जाळून हत्त्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार अनैतिक संबंधातून बुधवारी मध्यरात्री घडला आहे. (Big Breaking) या तिहेरी हत्याकांडाच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. (Big Breaking)
हत्याकांड कोठे घडला
ही हत्या कोंढवा परिसरातील पिसोळी येथील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये काल बुधवारी मध्यरात्री करण्यात आली आहे. दिराने वहिनीसह तिच्या दोन मुलांची पेट्रोल टाकून जाळून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
या घटनेनंतर कोंढवा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वैभव वाघमारे (वय 30 वर्ष राहणार मुक्काम पो. लोटा ता. औसा जि. लातूर) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे तर अम्रपाली वाघमारे असे मयत महीलेचे नाव आहे. मृतांमध्ये चार वर्षांच्या मुलीला आणि पाच वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे.
याप्रकरणी समीर साहेबराव मासाळ (34 वर्ष राहणार पद्मावती मंदिरासमोर पिसोळी कोंडवा पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तिघा मायलेकरांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह खोलीच्या समोरील पत्र्याच्या शेडमध्ये आणला. त्यानंतर घरातील कपडे, बेडशीट व लाकडच्या साह्याने पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्यात आले. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरोपी वैभव वाघमारे याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू अल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :