गणेश सुळ
Big Breaking News केडगाव : चौफुला (ता. दौंड) येथे ‛पत्नी’ने ‛पती’चा खून केल्याची धक्कादायक बाब यवत पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. (Big Breaking News)
संतोष पवार (वय-३९, रा.सध्या चौफुला, नवे गाव, मूळ कडेठाण ता.दौंड) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. तर पल्लवी पवार (वय २८ रा.सध्या चौफुला नवे गाव, ता.दौंड) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. (Big Breaking News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक संतोष पवार व आरोपी पल्लवी पवार हे नात्याने पती-पत्नी आहेत. दोन महिन्यांपूर्वी संतोष आणि पल्लवी हे कामाच्या शोधात चौफुला (ता.दौंड) येथील नव्या गावात राहण्यासाठी आले होते. तर संतोष पवार याला दारू पिण्याचे व्यसन असल्याने त्याची पत्नी पल्लवी पवार ही त्याला वारंवार समजावून सांगत होती. मात्र समजावून सांगूनही संतोष दारू पिण्याचे कमी करत नव्हता. (Big Breaking News)
दरम्यान, संतोष हा नेहमीप्रमाणे दारू पिऊन शनिवारी (ता.२२ जुलै) रात्री साडे नऊ ते दहाच्या सुमारास घरी आला. त्यावेळी चिडलेल्या पल्लवीने त्याला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. पल्लवीने त्याला हात, पायावर मारहाण करत असताना त्या काठीचा एक फटका संतोष याच्या डोक्याला लागला होता.
त्यानंतर संतोष याला दोन दिवसानंतर चक्कर येणे, उलट्या होणे असा प्रकार सुरू झाला. आणि संतोष याला रविवारी (ता.३०) अशीच मोठी चक्कर आली. त्याला तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी जाहीर केले. संतोष याचा आकस्मिक मृत्यू झाला असावा असे सर्वांना वाटत होते तशी माहितीही यवत पोलिसांना देण्यात आली होती.
मात्र यवतचे पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांना हा प्रकार संशयास्पद वाटत असल्याने त्यांनी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बाळासाहेब गाडेकर, विशाल जाधव, सोमनाथ सुपेकर, कापरे, महिला पोलीस चाफळकर या टीमच्या सहाय्याने अधिक तपास सुरू केला. तपास सुरू असताना संतोष याचा मृत्यू त्याची पत्नी पल्लवी हिने केलेल्या मारहाणीमुळेच झाला असल्याची गुप्त माहिती या टीमला समजली.
दरम्यान, संतोष याचा शवविच्छेदन अहवाल आला. यामध्ये संतोष चा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झाला असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे आणि त्यांच्या टीमने महिला पोलिसांना सोबत घेऊन पल्लवी पवार हिला राहत्या घरातून अटक केली आहे.