Big Breaking News पुणे : पुण्याच्या पूर्व भागातील हडपसर, मुंढवा, लोणी काळभोर, लोणीकंद, येरवडा, चंदननगर आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मटका, जुगार, गांजा विक्री, गावठी दारु विक्रीसह सर्व प्रकारचे अवैध धंदे वाढीस लागावेत यासाठी शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा “कलेक्टर” (पोलीस शिपाई) प्रयत्न करत असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. (Big Breaking News) पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यासाठी अधिकाऱ्यांना सक्ती केलेली असतानाच, त्यांच्याच खात्यातील काही अधिकारी व त्यांच्यासाठी माया गोळा करणारे ‘कलेक्टर’ अवैध धंदे वाढीसाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. (Big Breaking News)
अवैध धंदे वाढीसाठी बैठक?
हडपसर पोलीस ठाण्यातून बदली झाल्यानंतर पोलीस दलात वरिष्ठ अधिकारीपदी नियुक्त झालेल्या एका अधिकाऱ्याच्या ‘कलेक्टर’ने हडपसर व लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार, गांजा विक्री, गावठी दारु विक्रीसह सर्व प्रकारच्या अवैध धंदे अधिकाअधिक वाढावेत यासाठी पुणे-सोलापूर महामार्गावरील ‘मॅक्डॉनल्ड्स’मध्ये चार दिवसांपूर्वी चक्क बैठक घेतल्याची चर्चा आहे. या बैठकीला हडपसर व लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभरहून अधिक ‘बड्या’ अवैध धंदेवाल्यांनी हजेरी लावल्याची माहिती देखील पुढे येत आहे. (Big Breaking News)
कुंपणच खातंय शेत…
दरम्यान, पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार शहरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. या बैठकांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा घाम काढत असतानाच, दुसरीकडे मात्र त्यांच्याच हाताखालील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे १५ ते १६ पोलीस कर्मचारी उर्फ ‘कलेक्टर’ हडपसर, मुढंवा, लोणी काळभोर, लोणीकंद, येरवडा, कोंढव्यासह पुण्याच्या पूर्व भागातील बहुतांश पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांच्या वाढीसाठी तन, मन, धनाने प्रयत्न करत असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. (Big Breaking News)
हप्ता आणि धंदा वाढीसाठीही टीप्स
पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर हद्दीतील ‘मॅक्डॉनल्ड्स’मध्ये चार दिवसांपूर्वी पोलीस दलात वरिष्ठ अधिकारी झालेल्या एका अधिकाऱ्यांच्या ‘कलेक्टर’ने बड्या अवैध धंदेवाल्यांनी बैठक बोलावून त्यांना हप्ता वाढीबरोबरच धंदा वाढीसाठी टीप्स दिल्याची जोरदार चर्चा आहे. ही चर्चा एका ‘कलेक्टर’ने घेतलेल्या बैठकीची आहे. असे सुमारे १५ ते १६ ‘कलेक्टर’ विविध अधिकाऱ्यांच्या नावाने पुण्याच्या पूर्व भागातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंद्यांच्या वाढीसाठी प्रयत्न करत असल्याचे धक्कादायक वास्तव देखील यानिमित्ताने अधोरिखित झाले आहे. (Big Breaking News)
चहापेक्षा किटली गरम…
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना दिलेल्या असल्या, तरी त्यांच्या हाताखालील बहुतांश वरिष्ठ पोलीस अधिकारी अवैध धंद्यांना अघोषित पाठींबा देत असावेत, अशी परिस्थिती ‘कलेक्टर’ म्हणवल्या जाणाऱ्या शहर पोलीस दलातील १५ ते १६ पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे निर्माण झालेली आहे. (Big Breaking News)
एसीपी (एक व दोन), डिसीपी, डीसीपी क्राईम, नाक्रोटीक्स, मोक्का बी पथक, खंडणी, विविध युनिट, प्रशासन, क्राईम पीआय, पीसीबी अशा बाराहून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ‘कलेक्टर’ हडपसर, मुंढवा, येरवडा, चंदननगर, लोणी काळभोर, लोणीकंद पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील प्रत्येक छोट्या-मोठ्या अवैध धंद्यांवर स्वतः जाऊन हप्ता गोळा करत आहेत. हप्ता कमी मिळाल्यास ‘कलेक्टर’ लोकच आपल्या साहेबांचा हप्ता वाढवून मिळवण्यासाठी, अवैध धंदेवाल्याला त्याचा धंदा मोठा करण्याबाबत मार्गदर्शनही करत असल्याच्या चर्चा आहेत.
वरिष्ठांच्या ‘कलेक्टर’वर कारवाई कधी?
पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ओळख ही डॅशिंग, भ्रष्टाचारमुक्तीसाठी झटणारे व न्यायप्रिय अधिकारी अशी आहे. त्यांनी पुण्याचे आयुक्त म्हणून पदभार स्विकारताच, गुन्हेगारी रोखण्याबरोबरच नियमबाह्य गोष्टी बंद करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांचे कामही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मोक्कासारख्या कायद्याचा वापर करुन, अनेक गुंडांना तुरुगांतही पाठवले आहे.
मात्र, त्यांच्याच हाताखालील काही अधिकारी अवैध धंद्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत असल्याची बाब ‘मॅक्डॉनल्ड्स’मध्ये चार दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमुळे पुढे आली आहे. ‘कलेक्टर’चा रुबाब, त्यांच्या गाड्या, त्यांचे वागणे पाहिल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा साहेबांचाच कलेक्टर व्हावे असे वाटेल अशी परीस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार वरिष्ठांच्या ‘कलेक्टर’वर काय कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (Big Breaking News)