Big Breaking | पुणे : पुण्यातून एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील बिल्डर्स – कॉन्ट्रॅक्टरच्या घरी छापेमारी आज शुक्रवार (ता.१७) सकाळपासून सुरु केली आहे. यामुळे अनेक बिल्डर्स – कॉन्ट्रॅक्टरांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा पंतप्रधान आवास योजनेत गैरव्यवहार झाल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर आज सकाळच्या विमानाने जवळपास १५ लोकांचे पथक संभाजीनगरात दाखल झाले. छत्रपती संभाजीनगर येथे ईडीचे ९ ठिकाणी छापे टाकले. या छापेमारीनंतर ईडीला त्याचे धागेदोरे पुण्याशी असल्याचे या छापेमारीवरुन स्पष्ट झाले आहे. अशी माहिती समोर येत आहे.
४० हजार घरांसाठी चार हजार कोटींचा हा घरकुलाचा प्रकल्प उभारला जाणार होता…
पंतप्रधान आवास योजनेत समरथ मल्टीविज इंडिया, पुणे येथील सिद्धार्थ प्रॉपर्टीज, नवनिर्माण कन्स्ट्रक्शन यासह चार कंपन्यांनी निविदा भरली होती. ४० हजार घरांसाठी चार हजार कोटींचा हा घरकुलाचा प्रकल्प उभारला जाणार होता. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाकडून पडेगाव, तीसगाव, हर्सल, सुंदरवाडी, चिकलठाणा या ठिकाणची १२८ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात आली होती.
दरम्यान, पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा झाला होता. याची तक्रार महापालिकेने पोलिसात दिली होती. एकाच लॅपटॉपवरून (आयपी ॲड्रेस) टेंडर (निविदा) भरण्यात आल्याचे उघडकीस आल होते, त्यामुळे महापालिकेच्या तक्रारीवरून तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या १९ मालक- भागीदारांविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समरथ मल्टीविज इंडिया, पुणे येथील सिद्धार्थ प्रॉपर्टीज, नवनिर्माण कन्स्ट्रक्शन यासह चार कंपन्यांनी निविदा भरली होती. त्याची चौकशी करण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Breaking News : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आजपासून दौंड-सोलापूर नवीन डेमो सुरु!