Big Breaking रायगड : इर्शाळवाडी (ता.खालापूर, जि रायगड) गावात दरड कोसळल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता.१९) रात्री अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत १०० हून अधिक जण अडकल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे. (Big Breaking)
मिळालेल्या माहितीनुसार, इर्शाळवाडी हे ५० ते ६० घरांची वस्ती असलेले गाव आहे. इर्शाळवाडी गाव इर्शाळगडाच्या पायथ्यापासून खूप उंचीवर आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. गावात पोहोचायला एका पायवाटेने जावे लागते. मात्र या गावात बुधवारी (ता.१९) रात्री अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास पावसामुळे इर्शाळगड खडकाचा काही भाग कोसळला आहे. आणि या दुर्घातानेत अनेक गावकरी माती-खडकांच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, पोलीस, जिल्हा प्रशासन, पनवेल आणि मुंबई महापालिकेची बचावपथक रात्रीच इर्शाळवाडीत दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे. बचाव पथकाने २५ हून अधिक लोकांना सुखरूप बाहेर काढले आहे. अशी माहिती मिळत आहे.
दरम्यान, सध्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे १०० हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून बचावकार्य सुरू आहे. यासह बचावकार्यात एनडीआरएफ, स्थानिक आणि काही स्वयंसेवी संस्थांकडून मदत मिळत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.
याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, इर्शाळवाडीकडे जाणारी पायवाट निसरडी आहे. त्यात मुसळधार पावसामुळे परिसरात खूप चिखल झाला आहे. त्यामुळे इर्शाळवाडी गावाकडे जाणं अवघड झालं आहे. पाऊस आणि धुक्यामुळे पुरेशी दृष्यमानता नाही, परिणामी मदतकार्यासाठी हेलिकॉप्टर इर्शाळवाडीत नेता येत नाहीये. हेलिकॉप्टर तिथे नेण्यासाठी सज्ज आहे. परंतु दृष्यमानतेअभावी इर्शाळवाडीकडे नेता येत नाही. अशी खंत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
बचाव पथकांसमोर आव्हानांचा ‘डोंगर’!.
इर्शाळवाडीत सुरू असलेल्या बचावकार्यात अनेक अडचणी येत आहे. गावापर्यंत पोहोचायला चांगला रस्ता नसल्यामुळे तिथे जेसीबीसारखी वाहनं आणि मोठी यंत्रसामग्री नेता येत नाहीये. त्यामुळे लहान-मोठी अवजारं वापरून बचाव पथकं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम करत आहेत. त्यामुळे लहान-मोठी अवजारं वापरून बचावपथकं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम करत आहेत. एनडीआरएफच्या जवानांसह बचावपथकांना नेहमीची कुदळ आणि फावडं यांसारख्या लहान-मोठ्या अवजारांच्या मदतीने मातीचा ढिगारा उपसावा लागतोय.